मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी प्रश्वांवर आणि कोरोना लसीबाबत चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे.
अधीर रंजन चौधरी यांची मागणी रास्तच -
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात केलेली मागणी योग्यच आहे. हिवाळी अधिवेशन न ठेवणे तसेच प्रश्नोत्तराचा तासही गुंडाळणे हे लोकशाहीसाठी हितकारक नाही. विरोधक आणि शेतकरीदेखील 2 दिवसांच्या संसदीय अधिवेशनाची मागणी करत आहे, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार विधिमंडळाचे अधिवेशन
आरोग्य सचिवांनी सांगितले आहे की, त्यांनी लस सर्वांना दिली जाईल असे कधीच म्हटले नाही. ती विनामूल्य मिळणार का? हादेखील प्रश्न आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी प्रश्वांवर आणि कोरोना लसीबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मंत्री मलिक यांनी केली.