ETV Bharat / state

'तुम्ही रामदेवबाबांना जमिनींची खैरात वाटली तशी आम्ही नाही वाटली' - नवाब मलिकांची भाजपवर टीका

फडणवीस सरकारने आपल्या सत्ताकाळात ज्याप्रकारे रामदेव बाबांना जमिनींची खैरात वाटली, तसे आम्ही केले नसल्याचे वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केले. जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला ५१ एकर जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याविरोधात विरोधीपक्षांकडून चुकीची माहिती माध्यमांना देण्यात आल्याचे मलिक म्हणाले.

Minister nawab malik comment on BJP
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Feb 6, 2020, 4:57 PM IST

Updated : Feb 6, 2020, 5:18 PM IST

मुंबई - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागच्या फडणवीस सरकारवर जोरदीर टीका केली. फडणवीस सरकारने आपल्या सत्ताकाळात ज्याप्रकारे रामदेव बाबांना जमिनींची खैरात वाटली, तसे आम्ही केले नसल्याचे वक्तव्य मलिक यांनी केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भाडे तत्वावर आम्ही जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला जमीन दिली असल्याचे मलिक म्हणाले.

जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला ५१ एकर जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याविरोधात विरोधीपक्षांकडून चुकीची माहिती माध्यमांना देण्यात आल्याने त्यावर मलिक यांनी मंत्रालयात एका पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट ही संस्था ऊस आणि इतर विषयावर संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असल्याने भाजप जर आक्षेप घेत असेल, तर त्यांचेही लोक या संस्थेवर आहेत ही बाब त्यांना माहीत नाही काय? असा सवालही करत मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला जमीन ही विकत दिली नाही. तर ती काही वर्षांच्या करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यासाठीची कार्यवाही केली हेाती. आम्ही आता निर्णय घेतला असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.

हे आहेत सदस्य
वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटवर प्रामुख्याने शरद पवार यांच्यासोबतच दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहीते-पाटील, इंद्रजीत मोहिते, आशुतोष काळे, विशाल पाटील, बाळासाहेब थोरात, जयप्रकार दांडेगावकर, शंकरराव कोल्हे, अरुण लाड, मदन भोसले, सतेज पाटील आदी सदस्य या संस्थेवर आहेत.

Intro:रामदेव बाबांना जशा जमिनींची खैरात वाटली, तशी आम्ही वाटली नाही- नवाब मलिक

mh-mum-01-ncp-navabmalik-ramdevbaba-7201153
यासाठीचे फीड मोजोवर पाठवलेले आहे

मुंबई, ता.६ :
फडणवीस सरकारने आपल्या सत्ताकाळात ज्याप्रकारे रामदेव बाबा यांना जमिनींची खैरात वाटली, तसे आम्ही जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला जमीन वाटली नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ती काही वर्षांनी भाडे तत्वावर आणि देण्याचा निर्णय घेतला असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला ५१ एकर जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने त्याविरोधात विरोधीपक्षाकडून चुकीची माहिती माध्यमांना देण्यात आल्याने त्यावर मलिक यांनी मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला ही संस्था ऊस आणि इतर विषयावर संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असल्याने भाजप जर आक्षेप घेत असेल तर त्यांचेही लोक या संस्थेवर आहेत ही बाब त्यांना माहीत नाही काय असा सवाल करत सांगत मलिक यांनी भाजपावर टीका केली.
सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला जमीन ही विकत दिली नाही. तर ती काही वर्षांच्या करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यासाठीची कार्यवाही केली हेाती. आम्ही आता निर्णय घेतला असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.

--
हे आहेत सदस्य.....
वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटवर प्रामुख्याने शरद पवार यांच्यासोबतच दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहीते-पाटील, इंद्रजीत मोहिते, आशुतोष काळे, विशाल पाटील, बाळासाहेब थोरात, जयप्रकार दांडेगावकर, शंकरराव कोल्हे, अरुण लाड, मदन भोसले, सतेज पाटील आदी सदस्य आहेत.
Body:रामदेव बाबांना जशा जमिनींची खैरात वाटली, तशी आम्ही वाटली नाही- नवाब मलिक
Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.