ETV Bharat / state

पोलिसांनी चांगले काम केल्यास नावलौकिक वाढतो अन् आमच्या डोक्याचा त्रास कमी होतो - मंत्री जयंत पाटील - शिराळा पोलीस

पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास समाजात पोलिसांबद्दल आत्मियता आणि पोलिसांचे नावलौकिक वाढते आणि लोकप्रतिनिधी व राज्यकर्त्यांच्या डोक्याला त्रास ही होत नाही, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याचा देशातल्या "टॉप टेन"यादीत सातवा क्रमांक आल्याबद्दल शिराळा याठिकाणी आयोजित कौतुक सोहळ्यावेळी ते बोलत होते.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 5, 2021, 9:27 PM IST

सांगली - पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास समाजात पोलिसांबद्दल आत्मियता आणि पोलिसांचे नावलौकिक वाढते आणि लोकप्रतिनिधी व राज्यकर्त्यांच्या डोक्याला त्रास ही होत नाही, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याचा देशातील "टॉप टेन"यादीत सातवा क्रमांक आल्याबद्दल शिराळा याठिकाणी आयोजित कौतुक सोहळ्यावेळी ते बोलत होते.

बोलताना मंत्री जयंत पाटील

शिराळा पोलीस देशात सातवे....

सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याने देशातील "टॉप टेन" पोलीस ठाण्याच्या यादीत येण्याच्या बहुमान मिळवला आहे. शिराळा पोलीस ठाण्याने सातवा क्रमांक मिळवत देशास्तरावर चमकणारे शिराळा पोलीस ठाणे हे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस ठाणे ठरले आहे. स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी हा बहुमान देण्यात येतो. या यशस्वी कामगिरीबद्दल सांगली पोलीस दलाच्या शिराळा पोलीस ठाण्याचा कौतूक सोहळा आज (दि. 5) शिराळा याठिकाणी पार पडला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते शिराळा पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचाहस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मग,आमच्या डोक्यालाही त्रास होत नाही..

यावेळीजलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, शिराळा पोलीस ठाण्याचा सातवा क्रमांक आला आहे. सर्व पोलीस दलाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. तसेच चांगले पोलीस अधिकारी असतील तर फार चांगले काम होऊ शकते होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांनी डोक्याला त्रास होत नाही. याशिवाय चांगला अधिकारी असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोणावर अन्याय न करणे हेदेखील महत्वाचे आहे. कोणावरही अन्याय होऊ नये हे आमचे सूत्र आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास पोलिसांबद्दल लोकांमध्ये आत्मीयता वाढते आणि पोलिसांचे नाव लौकिक पण वाढतो,असा विश्वासही मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा - अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - संजयकाका पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.