ETV Bharat / state

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडीला अखेर हिरवा कंदील - local bodies election latest news

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी बैठका आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडीला अखेर हिरवा कंदील

author img

By

Published : May 13, 2020, 5:10 PM IST

मुंबई - जगभर कोरोनाने कहर केला असताना राज्यातही शहरांबरोबर गावगाडा ठप्प झाला आहे. राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींची बैठक घेण्यास सशर्त संमती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने जारी केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी बैठका आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च २०२० रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी. तसेच या बैठका घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ठप्प झालेल्या गावागाड्याला सरपंच उपसरपंच निवडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.