मुंबई - आमदारांना दिलेली मंत्रिपदे ही जनतेची कामे करण्यासाठी दिलेली आहेत. त्यामुळे जनतेची कामे करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची बोलून सोडवायला पाहिजे, असे स्पष्ट मत मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar Criticize To Abdul Sattar ) यांनी व्यक्त केले आहे.
नाराज लोक षडयंत्र करीत असल्याचा जाहीर आरोप आपल्याला पक्षातूनच विरोध होत आहे. काही नाराज लोक षडयंत्र करीत असल्याचा जाहीर आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar Allegation ) यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. अशा पद्धतीने जाहीरपणे वक्तव्य करणे योग्य नाही. जर तुम्हाला एखाद्या विषयी अडचण असेल अथवा काही मुद्दा असेल तर तो तुम्ही पक्षाच्या व्यासपीठावर मांडला पाहिजे किंवा थेट मुख्यमंत्र्यांची संपर्क साधला पाहिजे. तुम्हाला देण्यात आलेली पदे ही जनतेची कामे करण्यासाठी दिली आहेत, असा टोलाही यावेळी केसरकर यांनी लगावला. मात्र या संदर्भात आपण अधिक बोलू इच्छित नाही, मुख्यमंत्रीच याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
शिरसाटच मुलाला समजवू शकतात शिंदे गटाचे दुसरे आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Sirsat ) यांच्या मुलाने एका केटरिंग व्यावसायिकाला धमकावण्यात संदर्भात प्रतिक्रिया विचारताच केसरकर म्हणाले की, मुले आपले चांगले ऐकतात. त्यामुळे संजय शिरसाटच आपल्या मुलाला समजू शकतात. मात्र तरीही यासंदर्भात पोलिसांनी दखल घेऊन काही कारवाई करायची असल्यास त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा येणार नाही. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
संभाजी राजे धर्मरक्षकच अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांना धर्मवीर म्हणून असे वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात विचारले असता केसरकर म्हणाले की संभाजी राजे हे धर्मरक्षकच आहेत. त्यांनी धर्मासाठी काम केल्याचा दाखला आहे. त्यांचे डोळे काढण्यात आले होते, ते धर्मासाठी असेही केसरकर यांनी म्हटले आहे.