ETV Bharat / state

Border Dispute : मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा 6 डिसेंबरला बेळगाव दौरा - Shambhuraj Desai

सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका होती. या पार्श्वभूमीवरच हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होते, परंतु आता हा दौरा ६ डिसेंबर रोजी होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 2, 2022, 3:16 PM IST

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher Technical Education Minister Chandrakant Patil ) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ( Excise Minister Shambhuraj Desai ) या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला भेट देणार होते. परंतु आता ही भेट ३ डिसेंबर एवजी ६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

6 डिसेंबर रोजी बेळगाव दौरा - मागील काही दिवासंपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यांनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीका केली आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलच तापले आहे. तर सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका होती. या पार्श्वभूमीवरच हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होते, परंतु आता हा दौरा ६ डिसेंबर रोजी होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय आहे ट्विट मध्ये? - ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना येण्याचा बेळगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचा आग्रह आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री आमचा ३ डिसेंबरचा बेळगाव प्रवास ६ डिसेंबरला करणार आहोत, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.