ETV Bharat / state

मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब

मुंबई : ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. आज (28 सप्टेंबर) परब मुंबईतील ईडी कार्यालयात पाहोचणार आहेत. दरम्यान, ईडीची दुसरी नोटीस आल्यानंतर परब ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत.

Anil Parab EDs inquiry
Anil Parab EDs inquiry
author img

By

Published : Sep 28, 2021, 12:03 PM IST

Updated : Sep 28, 2021, 12:52 PM IST

मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर ते चौकशीसाठी 'ईडी' कार्यालयात हजर झाले आहेत. 'ईडी' कार्यालयात जाण्याच्या आधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईडी'च्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले. तसेच ईडीने आपल्याला समन्स कोणत्या कारणासाठी बजावला आहे, याबाबत स्पष्टता नसल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली.

प्रतिक्रिया

'मी कोणताही गैरव्यवहार केला नाही' -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलांची शपथ घेऊन मी पुन्हा एकदा सांगतो की, मी कोणताही गैरव्यवहार केला नाही, तसेच चौकशी दरम्यान 'ईडी'ने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत. आपल्याला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. असेही अनिल परब यांनी म्हटेल. यापूर्वीही 'ईडी'ने अनिल परब यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी आपण चौकशीला हजर राहू शकणार नाही, असे अनिल परब यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यानंतर 'ईडी'ने दुसर समन्स पाठवत 31 ऑगस्टला हजर राहण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी अनिल परब यांनी आजची वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ते आज 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

परबांविरोधात 'ईडी'कडे तीन तक्रारी

'ईडी'कडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. 'ईडी'ने परबांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवत गैरहजर राहिले होते. त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) परब यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे 'ईडी'ने पाठवलेल्या समन्समध्ये नमूद केले होते. त्यानुसार परब आज 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जात आहेत.

chronology समज लिजीये, संजय राऊतांची केंद्रावर टीका

परबांना आलेल्य्या नोटीशी संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट केले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर अनेक आरोप केले. 'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र!', असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते.

  • शाब्बास!
    जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
    chronology कृपया समज लिजीये.
    कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र

    — Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेनेचे पंचरत्न ईडीच्या रडारवर

शिवसेनेचे 5 मोठे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळांवर सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळीही ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांनीही मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे.

प्रताप सरनाईक

याशिवाय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अकडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी तब्बल सहा तास चालली होती. ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.

आनंदराव अडसूळ

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतलं. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

भावना गवळी 'ईडी'च्या रडारवर

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना डिसेंबर 2020 मध्ये सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवण्यात आली होती. 55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली होती. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा - अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Last Updated : Sep 28, 2021, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.