मुंबई - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे लवकरच मंत्रालयासमोर असलेल्या ए 6 या बंगल्यावर राहण्यासाठी येणार आहेत. याआधी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी या बंगल्यावर ठाकूर यांच्या नावाची पाटी लावली होती.
राज्य सरकारने सर्व मंत्र्यांना शासकीय बंगले जाहीर केले. मात्र, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या नावाची पाटी लावली होती. यानंतर ए 6 हा बंगला चर्चेत आला होता. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाने दिलेल्या बंगल्यातच वास्तव्य करावे, अशा सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर ठाकूर यांच्या नावाची पाटीही काढण्यात आली होती. तर आता लवकरच आदित्य ठाकरे हे मंत्रालयात वास्तव्यास येणार आहेत.
हेही वाचा - संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी