मुंबई - मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, घाबरु नका. 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीच्या तख्तात बसणार म्हणजे बसणारच, असा निर्धार राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. ( Aditya Thackeray on Marathi Bhasha Diwas ) काही पक्ष नाटक करतात, शिवसेना मात्र परखडपणे बोलते. मराठी भाषा पुढे नेण्याची आज चिंता न करता, आजचा दिवस साजरा करु या, असे आवाहन करत मराठी भाषा दिल्लीपुढे कधीही झुकली नाही आणि झुकणार नाही, असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले. ( Shivsena Marathi Bhasha Celebration 2022 Mumbai ) केंद्र शासनाच्या सततच्या दबाव तंत्र विरोधात शिवसेना आता आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई ( Minister Subhash Desai ), खासदार गजानन किर्तीकर ( MP Gajanan Kirtikar ), अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ), अनिल देसाई ( Mp Anil Desai ), महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on Marathi Bhasha Gauravo Diwas ) आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी, गुंतवणुकीत मुंबईचा 32 टक्के वाटा आहे. मात्र, केंद्राकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा घाट सुरू आहे. अनेक उद्योगधंदे, व्यापार, विविध प्राधिकरणे इतरत्र हलवण्यात येत आहेत. मुंबईचा दर्जा कमी व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. शिवसेना मुंबईत आहे, तोपर्यंत कोणालाही कदापि शक्य होणार नाही, असे सांगताना शिवसेना पक्ष प्रमुखांनी यात लक्ष घालावे, असे विधान केले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हाच धागा पकडून भाजप सरकारला चिमटे काढले.
हेही वाचा - Face to Face: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबत घोडे नेमके कुठे अडकले? मंत्री सुभाष देसाई म्हणाले...
मंत्री सुभाष देसाईंना विनंती -
परदेशात मराठी भाषेबाबत सुरू असलेले उपक्रम सांगताना, युकेमध्ये मराठी मंडळ स्थापन करण्याची मागणी जोर धरत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील मराठी बोली भाषा ठिक आहे. मात्र, सुभाष देसाईंनी आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे, त्यांनी थोडी सोपी करुन द्यावी, असेही ठाकरे म्हणाले.
मरिन ड्राईव्ह येथे मराठी भाषा मंडळाच्या इमारतीमध्ये भाषा भवन सुरू करत आहोत. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारले जाणार आहे. गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करणार आहोत. पर्यटकांना भुरळ पडेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच फिल्मसिटी भागात जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईत मनपाच्या नऊ भाषिक शाळा आहेत. मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरू असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मनपा शाळांतील विद्यार्थी गळतीवर बोलले जाते. ही बाब विचारात घेत, मुंबई महापालिकेच्या 1 हजार 232 शाळांत 11 शाळा सीबीएससी आणि आयसीसी केल्या आहेत. एकेकाळी गळती लागलेल्या मनपाच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी आज रांगा लागल्या आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच कोणतेही बोर्ड असले तरी 10 वीपर्यंत मराठी अनिवार्य केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.