ETV Bharat / state

'सर्वांच्या एकत्रित सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवा' - Aaditya Thackeray meeting mumbai

अनियमित पाऊस, निसर्गसारखी वादळे किंवा कोरोनासारखी संकटे ही सर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली संकटे आहेत. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मंत्री आदित्य ठाकरेंनी दिले.

aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Nov 3, 2020, 7:13 PM IST

मुंबई - पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकतेच ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. लोकप्रतिनिधी, शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी यांच्यासह लोकसहभागातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

मंत्री ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते, तर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

हवामानातील बदलामुळे निर्माण झाली संकटे
ठाकरे म्हणाले की, अनियमित पाऊस, निसर्गसारखी वादळे किंवा कोरोनासारखी संकटे ही सर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली संकटे आहेत. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. याची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून करण्यात यावी. शासकीय कार्यालयांमधील ऊर्जा वापराचे लेखापरीक्षण, पाणी वापराचे लेखापरीक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामग्रीचे व्यवस्थापन, परिवहन साधनांचे लेखापरीक्षण, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदी बाबींवर काम करण्यात यावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमात या योजनेचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अग्रभागी ठेवावे’
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भावी पिढीला स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि मुबलक उर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. सर्वांनी समन्वयाने ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अग्रभागी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विविध उपक्रमांची माहिती

अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था,एनसीसी, एनएसएस यांचा सहभाग घेणे, नद्यांची स्वच्छता करणे, जैवविविधता जपणे, हरितपट्टे तयार करणे, कचऱ्याचे विलगीकरण, सायकल ट्रॅक निर्मिती, देशी झाडांचे रोपण, अर्बन फॉरेस्ट तयार करणे, सायकल शेअरींग, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, कांदळवनांचे जतन-संवर्धन, शहरांमधील धुळ कमी करण्याचे नियोजन, गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन, नदी, तलाव, नाल्यांचे पुनुरुज्जीवन, सिमेट रस्त्यांजवळील झाडांचे डी-चौकींग करणे आदी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.