ETV Bharat / state

दुधाचे भाव वाढवून ५ रुपये अनुदान द्या; दुध उत्पादक संघाची मागणी

१ फेब्रुवारीपासून दुधाचे अनुदान बंद करण्यात आले आहे. ते पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी दुध उत्पादक संघाने केली आहे.

दूध
author img

By

Published : Mar 5, 2019, 12:04 AM IST

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अनेक घोषणा सरकरातर्फे करण्यात येत आहेत. मात्र, दूधदरवाढीचा विषय मागे पडला आहे. १ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे. हे अनुदान पूर्ववत करून ५ रुपये भाववाढ करण्यात यावी, अशी मागणी दुध उत्पादक कल्याणकारी संघाने केली आहे.

डेरे व्हीडिओ

दूध दरवाढ केली नाही, तर दूध उत्पादकावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे दुध संघाने म्हटले आहे. सरकार भाववाढीच्या बाबतीत धरसोडपणा करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. तेव्हा सरकारने यात लक्ष घालावे. हा व्यवसाय जीवंत ठेवण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुलाबराव डेरे यांनी केली.

जनावरांच्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण, दुधाचे भाव वाढवण्यात येत नाहीत. प्रथम २७ रुपये लिटर प्रमाणे भाव देण्यात आला नंतर पंचवीस रुपये लिटर भाव करण्यात आला आता तर १८ ते २० रुपये करण्यात आला. उलट दरवाढ करण्याऐवजी दरकपात करण्यात आलेली आहे. दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव असावा, अशी मागणी करण्याता आली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे ३.५ फॅट व ८.३ एसएनएफ असलेल्या दुधास २६ रुपये दहा पैसे असा भाव होता. शासनाने दूध स्वीकृतीसाठी ३.२ व ८.३ एसएनएफ असलेले दूध स्वीकारण्यास मान्यता दिली. म्हणजेच दूध स्वीकृतीसाठी मान्यता दिलेले दूध योग्यच असल्याने दोन्ही भावात तफावत असली पाहिजे. परंतु प्रत्येक पॉइंटला एक रुपया कमी करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. प्रत्येक लिटरमागे शेतकऱ्याचा दोन रुपये तोटा केलेला आहे, असे दुध संघाने सांगितले.

undefined

Intro:Body:MH_Dairy_MilkPriceGD4.3.19

Byte :गुलाबराव भगवंता डेरे, अध्यक्ष दुध उत्पादक कल्याणकारी संघ

घोषणांच्या गर्दीत दूधदरवाढ विरली ...
दुधाचे भाव कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
प्रति लिटर 5 रुपये भाव वाढवून बंद केलेले 5 रुपये अनुदान पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकापुर्वी घोषणांची मांदियाळी सुरु असताना दूधदरवाढीचा विषय मात्र विरला आहे. शेतकऱ्यांचे 1 फेब्रुवारी 2019 पासून बंद करण्यात आलेले 5 रुपये अनुदान त्वरित पूर्ववत करुन दुधास प्रति लिटर 5 रुपये भाव वाढवून देण्याची मागणी दुध उत्पादक कल्याणकारी संघाने केली आहे.

राज्यात सर्व शेतकरी या महाभयानक दुष्काळाने हवालदिल झालेली आहेत. 1972 पेक्षा भयंकर दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या जवळ असणाऱ्या गोधनाची फारच हाल आहेत. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अशी महाभयंकर हालत आज झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरांना पोटभर खाद्य मिळत नाही. दूध उत्पादन कमी होऊ लागली आहे. असे असताना दुधाचे भाव कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. त्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आपण शेतकर्‍यांची दयनीय स्थिती लक्षात घेऊन शेती पूरक असा दूध व्यवसाय जगविण्यासाठी मदत करावी. दुधास प्रति लिटर 5 रुपये भाव वाढवून देऊन वर दिले जाणारे व आता बंद केलेले 5 रुपये अनुदान त्वरित पूर्ववत करण्यात यावे, अशी दुध उत्पादकांची मागणी आहे.

आपण जर दूध वाढ केली नाही तर दूध उत्पादनावर आधारित जीवन जगणारे सुशिक्षित बेरोजगार त्याचप्रमाणे शेतमजूर यांना जीवन जगणे असह्य होऊन यांचे पाय आपोआपच आत्महत्येकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपण जो भाववाढीत धरसोडपणा करतात याचा ही अतिशय वाईट परिणाम होत आहे. शाश्वत असा भाव नसल्याने जीवन जगणे कठीण झालेले आहे तरी आपण पूर्णपणे लक्ष घालून दूध व्यवसाय जिवंत ठेवावा ही विनंती गुलाबराव डेरेंनी केली आहे.

जनावरांसाठी लागणारी पशुखाद्य व चाऱ्याची भाव गगनाला भिडलेली आहे. ते पुढील प्रमाणे -
ऊस 2018 प्रति टन 1700 आज 3500
ओला चारा 2018 प्रति टन 1500 आज 3000
वाळलेली वैरण 2018 प्रति टन 4000 आज 8000
पशुखाद्य 2018 प्रति क्विंटल 2000 आज 2600
सरकी पेंड 2018 प्रति क्विंटल 1700 आज 2500
वालीस 2018 प्रति क्विंटल 1500 आज 2000

वरील प्रमाणे जनावरांच्या चाऱ्याची आणि पशुखाद्याची भाव आहेत. वरील बाबींकडे लक्ष वेधले असता आपणास असे दिसून येते की कालचे भाव आजचे भाव यात दुपटीपेक्षा जास्त भाव वाढ झालेली आहे मात्र दूध दरवाढ ही हास्यास्पद अशी करण्यात आलेली आहे प्रथम 27 रुपये लिटर प्रमाणे भाव देण्यात आला नंतर पंचवीस रुपये लिटर भाव करण्यात आला आता तर 18 ते 20 रुपये करण्यात आला.

दरवाढ करण्यात येण्याऐवजी दर कपात करण्यात आलेली आहे. पण कालच्या चाऱ्याच्या भावात व आजच्या चाऱ्याच्या भावात भयंकर वाढ झालेली असताना दूध दरवाढ एक रुपया सुद्धा वाढवू नये ही आश्चर्यकारक घटना आहे आपण खरोखर ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत नाही दुप्पट दरवाढ देऊ शकत नाही,परंतु किमान 30 रुपये प्रति दुधास भाव मिळणे प्राप्त आहे. जर आपण याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील व सर्व असाही झालेले गावोगावी अराजकता माजेल.
शासन निर्णयाप्रमाणे 3.5 फॅट व 8.3 एस एन एफ असलेल्या दुधास 26 रुपये दहा पैसे असा भाव होता . शासनाने दूध स्वीकृतीसाठी 3.2 व 8.3 एसएनएफ असलेले दूध स्वीकारण्यास मान्यता दिली. म्हणजेच दूध स्वीकृतीसाठी मान्यता दिलेले दूध योग्यच असल्याने दोन्ही भावात तफावत असली पाहिजे. परंतु आपण प्रत्येक पॉइंटला एक रुपया कमी करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. प्रत्येक लिटरमागे शेतकऱ्याचा दोन रुपये तोटा केलेला आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.
3.5 फॅट व 8.5 एसएनएफ शासनाचा निर्धारित दर प्रत्येक पॉइंटला 30 पैसे आहे तर खासगी प्रकल्प वाल्यांनी मात्र दहा पैसे म्हणजेच सरकारच्या नियम धाब्यावर बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ताधारक दूध घालावे की नाही असे झाली आहे त्यामुळे दुधाची गुणवत्ता ढासळलेली असून दूध भेसळ प्रोत्साहन मिळालेले आहे. आज सुद्धा भेसळीच्या दुधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
सदर प्रश्नांमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय नष्ट करावा जर आपण योग्य ती कारवाई केली नाही तर शेतकऱ्यांच्या रोषास आपण कारणीभूत ठरणार व शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही आज शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न झालेला अाहे असे,गुलाबराव भगवंता डेरे अध्यक्ष दुध उत्पादक कल्याणकारी संघ यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.