मुंबई : मंडाळे डेपोमध्ये ७२ स्थिर मार्गिका असतील तसेच स्टेबलिंग यार्ड (Stabling Yard), हाजार्ड स्टोर इमारत हेवी वॉश प्लांट, भूमिगत टाकी, डीसीसी प्रशासकीय इमारत, सेंट्रल स्टोअर इमारत, वर्कशॉप, तपासणी इमारत, सी.एम.व्ही. इमारत, रिसीव्हिंग सबस्टेशन , टेस्ट ट्रॅक, ईटीपी (ETP) आणि एसटीपी (STP) कंपाउंड वॉल, सिक्युरिटी वॉच टॉवर इ. सुविधांचा समावेश आहे.
एमएमआरडीएने मंडाले डेपोत उभारली धूळ शमन यंत्रणा : एमएमआरडीएची टीम पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंडाले डेपो मध्ये धूळ उत्सर्जन नियंत्रणासाठी उपाय योजना (Pollution control system) आखली आहे. जसे की साईटवर वेळोवेळी पाणी शिंपडणे, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डिझाइन केलेली यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरणे, उत्खनन सामग्री घेऊन जाणारी वाहने ताडपत्रीने झाकून ठेवणे, धूळ उत्सर्जन कमी होईल अशा प्रकारे रचलेले उत्खनन साहित्य वापरणे, सर्व उत्खनन केलेल्या साहित्याची नियमितपणे नियुक्त केलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावणे यासारख्या धूळ नियंत्रण करण्याच्या दृष्टीने विविध गोष्टींचा अवलंब करत असल्यामुळे मंडाळे डेपोच्या परिसरात हवेची आणि आवाजाची गुणवत्ता पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानक मर्यादेत नोंदवली गेली आहे. (prevent environmental damage)
व्हीजेटीआय मधील तज्ञ काय म्हणतात : मंडाले या भागामध्ये प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड प्रमाणात खोदकाम आणि सिमेंट काँक्रीट याचा वापर होत असल्यामुळे कोरडी धूळ निर्माण होते. याबाबत व्हीजेटीआय तज्ञ प्राध्यापक प्रशांत भावे म्हणतात,"त्याशिवाय हवेतली आजूबाजूची धूळ देखील त्यात येऊन मिसळते त्यामुळे त्या धुळीवर नियंत्रण मिळवणे जरुरी आहे. अन्यथा ही धुळ जमिनीपासून वरती पंधरा ते वीस किलोमीटर नंतर वरती जाते मात्र वरती हवेचा जाड थर तयार असतो . हा हवेतील जो वरती तयार झालेला आहे तो केवळ बांधकामाच्या धुळीमुळे तयार झालेला नसतो तो वाहनांच्या प्रदूषणामुळे आणि इतर ठिकाणच्या धुळीमुळे आलेला असतो तो झाकण्यासारखा काम करतो परिणामी ही प्रदूषित हवा पुन्हा खाली येते. आपल्या नाकाद्वारे तोंडाद्वारे फुफुसात जाते त्यामुळे श्वसनाचे विकार यामुळे वाढतात. त्यामुळे वाहनांपासून होणारे प्रदूषण आणि इतर धूळ तिच्यावर शासन आणि समाज या दोघांनी जबाबदारीने नियंत्रण मिळवले पाहिजे. या संदर्भात मुंबई महानगरपाधिकरण आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले, 8 मंडाले डेपोचे बांधकाम करताना आम्ही अत्यंत काळजी घेत आहोत, तसेच सर्व आवश्यक निकषांचे पालन करत आहोत. आमची टीम वेळोवेळी सक्षम उपाय योजना राबवते. लवकरच संरचनात्मक कामे पूर्ण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे उद्दिष्ट आहे.