ETV Bharat / state

Maharashtra Weather Update: राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काही भागात गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता - विदर्भाला ऑरेंज अलर्ट

मागील काही दिवसांपासून राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे सावट अद्याप देखील कायम आहे. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह इतर भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने वर्तवली आहे. त्यामुळे मागील काही दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update
अवकाळी पावसाची शक्यता
author img

By

Published : Apr 25, 2023, 2:05 PM IST

मुंबई : सध्या गारपीट व अवकाळी पावसाचे ढग दाटून आहेत. हवामानातील या बदलांचा परिणाम मुंबई पुण्यासह मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र यासोबतच धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासह सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच जळगावसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

अवकाळी पावसाचे सावट : दरम्यान, वातावरण बदलामुळे अवकाळी व गारपीटीची स्थिती पुढचे काही दिवस सक्रिय राहणार असल्याची दाट शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त झाला आहे. पुढचे आणखी काही दिवस शेतकऱ्यावर अवकाळी पावसाच्या काळ्या ढगांचे सावट असणार आहे.

Maharashtra Weather Update
अवकाळी पावसाची शक्यता

विदर्भाला ऑरेंज अलर्ट : नागपूर प्रादेशिक वेध शाळेने विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन दिवस विदर्भातील पाच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर वेध शाळेकडून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्हात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहेल असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भाला गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Mumbai Rain Update : मुंबईत विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस; वीज पडल्याने नारळाच्या झाडाला लागली आग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.