मुंबई- देशभरात कोरोना आणि त्याचा कहर सुरू असतानाच टाटा सामाजिक संस्थेने आपल्या सर्व शिक्षण संकुलातील बीए सोशल सायन्सचा प्रवेश सुरू ठेवला आहे. टीआयएसएसने नुकतेच मुंबई, तुळजापूर आणि गुवाहटी येथे असलेल्या टाटा सामाजिक विज्ञानच्या बीए सोशल सायन्सची मेरिट लिस्ट जाहीर केली असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑलाइन मुलाखतीही सुरू केल्या आहेत.
टीआयएसएसने बीए सोशल सायन्सच्या प्रवेशाची मुख्य प्रक्रिया तुळजापूर आणि गुवाहटी येथील संकुलात ९ ऑगस्टपासून सुरू केली होती. त्याच दिवशी देशभरात प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामायिक प्रवेश परीक्षाही आयोजित करण्यात आली होती. आता मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर टीआयएसएसकडून २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत बीए सोशल सायन्स या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, तसेच शुल्कासंदर्भात कार्यवाही पूर्ण करून घेतली जाणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील अंतिम प्रवेश हा ११ सप्टेंबर रोजी पूर्ण केला जाणार आहे. तर प्रत्यक्षात शिकवणे आणि त्यासाठीची प्रक्रिया ही १४ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती टीआयएसएसकडून देण्यात आली आहे. टीआयएसएसकडून जाहीर करण्यात आलेली मेरिट लिस्ट आणि त्यासंदर्भातील काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना त्या टीआयएसएसच्या संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे.
हेही वाचा- राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 पोलिसांचा मृत्यू, 122 जणांना कोरोनाची लागण