मुंबई: एकीकडे राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप होत असताना आज महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार (Agreement Maharashtra And Ontario) करण्यात आला. विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक (huge investment in various sectors) होण्यास यामुळे मदत होणार आहे. Latest news from Mumbai
करारामध्ये कार्यप्रणालीवर भर देण्यात येईल : दोन्ही राज्यांमध्ये वित्तीय तसेच औद्योगिक विकासाबरोबरच कौशल्य वृद्धी विकास करण्यावर सहकार्य आणि संमतीने कार्यवाही करण्यात येईल. दोन्ही राज्य व्यापारवृद्धी आणि गुंतवणुकीमध्ये वृद्धी व्हावी याकरिता प्रयत्न करतील. या करारामध्ये कार्यप्रणालीवर भर देण्यात येईल. स्थानिक व क्षेत्रियस्तरावर परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येतील व दोन्ही राज्यातील प्रतिनिधींना,अनुभवी व्यक्तींना यासाठी आमंत्रित करण्यात येईल. उद्योगवाढीसाठी आवश्यक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करुन नवीन तंत्रज्ञान आधारित उद्योगवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. दोन्ही राज्यातील संशोधन क्षेत्रातील कंपन्या, इतर औद्योगिक कंपन्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना संमेलित करुन घेण्यात येईल.
औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक व रोजगार वृद्धीसाठी प्रयत्न : दोन्ही पक्ष औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक व रोजगार वृद्धीसाठी एकमेकांना सर्वतोपरी सहाय्य करतील. विशेषतः माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, माध्यम आणि मनोरंजन, विद्युत वाहन आणि बॅटरी पुरवठा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण या बाबींवर जास्त लक्ष देण्याबरोरबच इतरही बाबींकडे पूर्णपणे लक्ष देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.