ETV Bharat / state

मेहुल चोक्सीकडून जे जे रुग्णालयात वैद्यकीय अहवाल सादर करण्यास असमर्थता - पंजाब नॅशनल बँक

या अगोदरच्या सुनावणीत मेहुल चोक्सीने त्याच्या आजारपणाचे कारण देत भारतात येण्यासाठी आपण विमान प्रवास करू शकत नसल्याचे सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयात मेहुल चोक्सी याच्या या दाव्यावर त्याने त्याची अँटिग्वा येथील वैद्यकीय कागदपत्रे जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते.

मेहुल चोक्सी
author img

By

Published : Aug 27, 2019, 5:58 PM IST

मुंबई - मेहुल चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा वैद्यकीय अहवाल जेजे रुग्णालयात सादर करू शकत नसल्याचे कारण समोर केले आहे. पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करून मेहुल चोक्सी फरार आहे. मेहुल चोक्सी हा सध्या अँटिग्वा देशात असून तेथील डॉक्टरांनी आपल्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या या अगोदरच्या आदेशानुसार मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय अहवाल सादर करू शकणार नसल्याचे मेहुल चोक्सीच्या वकिलाकडून न्यायालयात कळविण्यात आले आहे.

या अगोदरच्या सुनावणीत मेहुल चोक्सी याने त्याच्या आजारपणाचे कारण देत भारतात येण्यासाठी आपण विमान प्रवास करू शकत नसल्याचे सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या या दाव्यावर त्याने त्याची अँटिग्वा येथील वैद्यकीय कागदपत्रे जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मेहुल चोक्सीकडून जेजे रुग्णालयात कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र अद्याप सादर करण्यात आलेले नाही.

ईडी न्यायालयाने मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. या विरोधात मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, वैद्यकीय अहवाल जेजे रुग्णालयात सादर करू न शकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार मेहुल चोक्सीच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली आहे.

Intro:पंजाब नॅशनल बँकेला १३ हजर कोटीहून अधिक रुपायांचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सी याने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा वैद्यकीय अहवाल जेजे रुग्णालयात सादर करू शकत नसल्याचे कारण समोर केले आहे. मेहुल चोक्सी हा सध्या अँटिग्वा देशात असून त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी आपल्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या या आगोदाराच्या आदेशाप्रमाणे मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय अहवाल सादर करू शकणार नसल्याचे मेहुल चोक्सी याच्या वकिलाकडून न्यायालयात कळविण्यात आले आहे.Body:या अगोदरच्या सुनावणीत मेहुल चोक्सी याने त्याच्या आजारपणाचे कारणं देत भारतात येण्यासाठी आपण विमान प्रवास करू शकत नसल्याचे सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयात मेहुल चोक्सी याच्या या दाव्यावर मेहुल चोक्सी याने त्याची अँटिग्वा येथील वैद्यकीय कागदपत्रे जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र मेहुल चोक्सी याच्या कडून जेजे रुग्णालयात कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र अद्याप सादर करण्यात आलेलं नाहीत.
Conclusion:ईडी न्यायालयाने मेहुल चोक्सी यास फरारा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते ज्याच्या विरोधात मेहुल चोक्सी याच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र वैद्यकीय अहवाल जेजे रुग्णालयात सादर करू न शकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार मेहुल चोक्सी च्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.