मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानाकादरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. अप-डाऊन लोकलच्या फेऱ्या ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील. त्यानंतर धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील बेलापूर/ नेरुळ-खारकोपर स्थानकादरम्यान सकाळी 11.05 वाजता ते सायंकाळी 4.05 वाजतापर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या हार्बर मार्गावरील पनवेल/ बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन मार्गावरील लोक सेवा रद्द करण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल अप-डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. बीएसयू अप मार्गावरील खारकोपर- नेरुळ / बेलापूर अप-डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
हेही वाचा - पहिल्याच पावसात लोकलचा खोळंबा; रेल्वेमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी