ETV Bharat / state

मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 30 मे 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड  रेल्वे स्थानकादरम्यान अपडाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

author img

By

Published : May 28, 2021, 8:07 PM IST

megablocks on all three railway lines on sunday in mumbai
मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 30 मे 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अपडाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

हेही वाचा - राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता

मध्य रेल्वेचा मुख्य मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्‍या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप स्थानकावर थांबतील. तसेच पुढे मुलुंड स्थानकापासून धीम्या मार्गावर वळविण्यात येईल. तर, ठाणे येथून सकाळी 10.27 ते दुपारी 03:55 पर्यंत अप धीम्या मार्गावरून सुटणाऱ्या उपनगरीय गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच भांडूप विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव स्थानकांवर थांबा देण्यात येणार असून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहेत.

हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या हार्बर मार्गावरील पनवेल/ बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4. 30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहेत.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळीव 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.