ETV Bharat / state

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईनवर मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक, 'या' गाड्या धावणार उशिरा - हार्बर रेल्वे

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही ठिकाणी यांत्रिकी कामानिमित्ताने रेल्वे प्रशासनाने आज मध्यरात्रीपासून शनिवार (13 जानेवारी) रोजी मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या विलंबानं धावणार आहेत. याबाबत सुधारित वेळपत्रकानुसार प्रवाशांनी आपला प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला यांनी केलंय.

Railway
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईनवर उद्या यांत्रिक कामामुळे मेगाब्लॉक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 12:58 PM IST

मुंबई : यांत्रिकी कामानिमित्तानं रेल्वे प्रशासनानं आज मध्यरात्रीपासून मेगाब्लाॅक घेण्याचं ठरवलं आहे. मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक हा ठाणे रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक या दरम्यान असणार आहे. या दरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गिकेवर यांत्रिकी आणि अभियांत्रिकी काम केलं जाणार आहे. या मेगाब्लॉकच्या संदर्भात शनिवार आज रात्री 11 वाजून 40 मिनिटांपासून ते रविवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वे या लोकलच्या जलद अप आणि डाऊन मार्गावरून धावतील. त्यामुळे रोजच्या वेळेपेक्षा या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मेगाब्लॉक : हार्बर रेल्वेचं अभियांत्रिकी काम केलं जाणार आहे. त्यामुळे हा मेगाब्लॉक असेल. वडाळा रोड रेल्वे स्थानक ते मानखुर्द रेल्वे स्थानक अशा मोठ्या पट्ट्यामध्ये मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी आणि मानखुर्द दिशेने जाणारी सर्व रेल्वे सेवा ही काही काळ बंद असेल. उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आयोजित केलेला आहे. या मेगाब्लॉकमुळे वडाळा रोड रेल्वे स्थानकापासून ते मानखुर्द रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाशी. तसंच, बेलापूर आणि पनवेलकडं जाणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सीएसएमटी ते पश्चिम रेल्वेकडं जाणारी हार्बर वरून जाणारी गोरेगाव लोकल ट्रेन ही वेळेवर धावणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचं मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला म्हणाले, 'नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे हा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे अनेक ट्रेन रद्द होणार आहेत. तसंच, ट्रेन उशिराने धावतील. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रकानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक : पश्चिम रेल्वे विभागात सांताक्रुज ते गोरेगाव या दोन रेल्वे स्थानकांमध्ये हा मेगाब्लॉक असणार आहे. चर्चगेटकडे येणाऱ्या आणि चर्चगेटवरून विरारकडे जाणाऱ्या दोन्ही दिशेला हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकची वेळ सकाळी दहा वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल. मेगा ब्लॉकच्या काळामध्ये ज्या लोकल धावणार आहेत. त्या जलद मार्गावरील सर्व लोकल या लोकल मार्गावर वळवण्यात येणार आहे. काही लोकलच्या फेऱ्या यामध्ये रद्द केलेल्या गेलेल्या आहेत. तर, काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

हेही वाचा :

1 माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेसची 'साथ' सोडणार? 'या' पक्षाचा पकडणार 'हाथ'

2 प्रभास, प्रशांत नीलसह टीमने साजरी केली 'सालार सक्सेस पार्टी'

3 गावगाडा हाकण्यासाठी सरपंचांची एकी; लोकनियुक्त सरपंच पालघर तालुक्याला बनवणार विकासाचं मॉडेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.