मुंबई : आज हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत सकाळी १०.२५ ते दुपायर ३.५५ या कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गवरील गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच सर्व ट्रेन १५ मिनिटे उशिरा धावणार आहे. या मेगा ब्लॉकची दखल घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हार्बरवर मेगाब्लॉक नाही : हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते मात्र रविवारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खारघर येथे विविध मार्गाने लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार व आमदार प्रसाद लाड यांनी रेल्वेला पत्र लिहून हा ब्लॉक रद्द करावा, अशी मागणी केली होती. हार्बर मार्गावरील ब्लॉक त्यानंतर रद्द करण्यात आला.
गर्दी होण्याची शक्यता : आज मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 या सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. मोठ्या प्रमाणात या पुरस्कार सोहळ्याच्या कामासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी देखील होवू शकते. आज हा पुरस्कार साडेदहाच्या दरम्यान पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्रीच मुंबईत दाखल झालेले आहेत. खारघरमध्ये हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठी आठवड्याभरापासून तयारी सुरू आहे. या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो अनुयायी खारघरमध्ये दाखल झालेले आहेत. मेगाब्लॉक हा रेल्वे प्रवाशांना चांगली सुविधा देता यावी, या उद्देशाने घेतला जातो. दर रविवारी तो आयोजित केला जातो.