मुंबई - येत्या रविवारी २३ एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकची दखल घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक - मध्य रेल्वे मार्गावर रविवार २३ एप्रिल रोजी माटुंगा ते मुलुंड मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबवल्या जाणार असून १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे या मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील पनवेल आणि गोरेगावकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावर ब्लॉक दरम्यान गाड्या रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
खोपोली कर्जत दरम्यान मेगाब्लॉक - मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी २५ आणि २८ एप्रिल दरम्यान सकाळी १०.४५ ते १२ या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत SKP - 5 आणि SKP - 10 खोपोली ते कर्जत लोकल ट्रेन रद्द राहतील. या कालावधीत ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस लोणावळा येथे १०.३२ ते ११.२५ या वेळेत थांबवली जाईल आणि वेळेपेक्षा ६५ मिनिटे उशिरा पोहोचेल. ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर ते एलटीटी एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचेल.