मुंबई Mega Block Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आज घेण्यात येणारा मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आलाय. यामुळं दिवाळीच्या दिवशी प्रवाशांना बिनधास्त रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. रेल्वेनं मेगाब्लॉक जाहीर केल्यानं ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना प्रवासात अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. दर रविवारप्रमाणे आजही मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार होता. तसंच हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या वेळेत ब्लॉक होता. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
-
📢#Information #MEGA_BLOCK_CANCELLATION 12.11.2023 (SUNDAY) pic.twitter.com/XNxIXSvQCR
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) November 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">📢#Information #MEGA_BLOCK_CANCELLATION 12.11.2023 (SUNDAY) pic.twitter.com/XNxIXSvQCR
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) November 11, 2023📢#Information #MEGA_BLOCK_CANCELLATION 12.11.2023 (SUNDAY) pic.twitter.com/XNxIXSvQCR
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) November 11, 2023
असा होता मध्य रेल्वेवरील ब्लॉक : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार होता. या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार होता. यामुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली होती. तसंच सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो लोकल सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाणार होत्या. त्यानंतर कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली होती. या मार्गावरील रेल्वे सेवा नेहमीप्रमाण सुरळित सुरू राहणार आहे.
हार्बर मार्गावरील ब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार होता. त्यामुळं सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल, बेलापूर, वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोडवरुन सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव इथून सुटणारी लोकल सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार होती. मेगा ब्लॉक रद्द केल्यानं सणानिमित्त मुंबईकरांना नातेवाईकासंह मित्रांना भेटणे आणि खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणे सोयीचं ठरणार आहे.
हेही वाचा :