मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (23 मे) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा भायखळा ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल भायखळा ते माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. अप मार्गावरील लोकल भायखळ्यानंतर, तर डाऊन मार्गावरील लोकल माटुंग्यानंतर जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी- चुनाभट्टी/ वांद्रे, सीएसएमटी/वडाळा ते पनवेल /बेलापूर /वाशी, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप-डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 9.53 ते सायंकाळी 4.58 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. सीएसएमटी/वडाळा ते पनवेल /बेलापूर /वाशी, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप-डाऊन मार्गावरील लोकल करण्यात येतील. यादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी भाईंदर ते वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा ब्लॉक नसेल, असे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'बार्ज पी ३०५' LIVE Updates : मृतांची संख्या 60 वर; पीडित कुटुंबीय आक्रमक