ETV Bharat / state

Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो आज रेल्वेचे हे वेळापत्रक पाहा... मध्य आणि हार्बर मार्गावर आहे मेगाब्लॉक - today Mega block timing

रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी व रेल्वेच्या देखभालसह दुरुस्तीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. अशावेळी मुंबईकरांना घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. मेगाब्लॉक असल्याने त्याची दखल घेऊन मुंबईकरांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mega block on Central and Harbor Road
author img

By

Published : Apr 2, 2023, 7:57 AM IST

Updated : Apr 2, 2023, 8:10 AM IST

मुंबई : ठाणे कल्याण दरम्यान मेगाब्लॉक -आज रविवारी २ एप्रिल रोजी ठाणे ते कल्याण या मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, याची मुंबईकरांना नोंद घ्यावी लागणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत तर कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकांवर थांबतील तसेच निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द पनवेल बेलापूर दरम्यान ट्रेन बंद -हार्बर मार्गवर पनवेल ते वाशी दरम्यान बेलापूर नेरुळ खारकोपर मार्ग वगळून सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर ट्रेन सुरू - पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरिता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल ट्रेन चालविल्या जाणार आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहेत. बेलापूर ते खारकोपर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना कोणताही बदल जाणवणार नाही.

हेही वाचा- Shobhan Choudhary: उत्तर रेल्वे विभागाकडून शोभन चौधरी यांची महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती

Last Updated : Apr 2, 2023, 8:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.