ETV Bharat / state

SSC-HSC Exams 2022 : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकातसंदर्भात आज बैठक - दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रक

कोरोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती. यंदा कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही अशाप्रकारे दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रक आणि मूल्यमापन आराखडा संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी आज बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कपात केली जाईल का? अंतिम परीक्षा नेमकी कशी होणार? अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

meeting regarding the schedule of 10th-12th exams scheduled today
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकातसंदर्भात आज बैठक
author img

By

Published : Nov 23, 2021, 12:24 PM IST

Updated : Nov 23, 2021, 2:56 PM IST

मुंबई - कोरोना आटोक्यात आल्यानंतर टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. (school opens in maharashtra) दहावी-बारावीच्या परीक्षा आणि मूल्यमापन यासंदर्भात आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी बैठक बोलावली आहे. ऑनलाईन स्वरुपात ही बैठक होणार असून शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, टास्क फोर्स समितीचे सदस्य, पालकवर्ग प्रतिनिधी उपस्थित राहतील.

आज शिक्षण समितीची बैठक -

कोरोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती. यंदा कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही अशाप्रकारे दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रक आणि मूल्यमापन आराखडा संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कपात केली जाईल का? अंतिम परीक्षा नेमकी कशी होणार? अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

हेही वाचा - maharashtra ssc board exam 2022 - दहावी परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने 18 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार

सरसकट शाळांचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीनंतर -

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने, राज्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळा-महाविद्यालये (काही वर्ग), मंदिरे सुरू केली आहेत. आता राज्यात सरसकट (पहिलीपासून) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक आहेत. काही पालकांचे शाळा सुरू करण्यावर एकमत झाले आहे. मुलांना डोस दिले जात नाहीत, तोपर्यंत शाळा सुरू करू नयेत, अशा टास्क फोर्स समितीच्या सुचना आहेत. यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवणार आहेत. या अहवालावर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल.

Last Updated : Nov 23, 2021, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.