मुंबई - हिवाळी अधिवेशना संदर्भात ( MH Assembly Winter Session ) कामकाज सल्लागार समितीची बैठक ( Working Advisory Committee ) विधानभवनात सुरू झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील बैठकीला उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहे. ( CM Uddhav Thackeray in Meeting of Working Advisory Committee )
हेही वाचा - Rajesh Tope on School Opening : शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नागपूरमध्ये मंत्री परिषद होणार? याबाबत २४ तारखेला होणाऱ्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन घ्यावे, अशी सुचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. कामकाज सल्लागार समितीत यावर चर्चा झाली. दरम्यान, २४ तारखेला निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. २२ ते २८ डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे.