मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली. बंगळुरू येथे काल एक लोकशाही आणि देशमप्रेमी लोकांची बैठक झाली. ती बैठक कुणाच्या विरोधात नव्हती, तर हुकुमशहीच्या विरोधात बैठक होती, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
देशप्रेमी एकत्र आले : बंगळुरू येथे देशातील भाजप विरोधातील सर्वंच लहान मोठ्या पक्षांची दोन दिवशीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला देशातील 26 पक्षांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला राज्यातून ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. बैठकी विषयी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले कि, बैठकीतील माहिती मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचली आहे. काल, परवा दोन दिवस बंगळुरूमध्ये देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली. देशप्रेमी, लोकशाहीप्रेमी पक्षांची आघाडी स्थापना झाली आहे. आमची लढाई एखाद्या व्यक्तीविरोधात नाही, कोणत्या पक्षा विरोधात नाही, तर हुकूमशाही विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री सातत्याने येणारी जाणारी लोक असतात, पण लोकशाही टिकली पाहिजे. जो पायंडा पडत चालला आहे, तो देशासाठी घातक आहे. हुकूमशाहीच्या विरोधात मजबूत आघाडी निर्माण झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.
तिजोरीच्या चाव्या परत त्यांच्याकडे : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेसह पक्षाचे इतर आमदार उपस्थित होते. भेटीचे कारण उद्धव ठाकरे यांना विचारले असता ठाकरे म्हणाले की, राज्यासाठी चांगल काम करावे, राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. पाऊस नसल्यामुळे काही भागात शेतकरी अहवाल दिल होत आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी सरकारकडे मागणी केली आहे. नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. अजित पवार यांनी माझ्या सोबत अडीच वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे परत एकदा दिल्या गेल्या आहे, असे ठाकरे म्हणाले.
तो व्हायरल व्हिडीओ : भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षेपार्ह कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी असे किळसवाने व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यांच्यावर राज्यातील जनतेने, माता भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On INDIA : आम्ही जमतो म्हटल्यावर मोदींना ९ वर्षानंतर एनडीएची आठवण-संजय राऊत यांचा टोला