ETV Bharat / state

'कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होऊ देणार नाही' - Minister Rajendra Shingne news

कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी, त्याचा तुटवडा भासू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

Minister Rajendra Shingne
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : Jul 17, 2020, 6:48 PM IST

मुंबई - कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी, त्याचा तुटवडा भासू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्यांच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधांची बाजारात अवाजवी दर आकारणी व साठेबाजी होत नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावी, असे काही आढळून आल्यास संबधिताविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. या दोन्ही औषधांचा राज्यात तुटवडा होत असून, काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी दोन्ही औषधांच्या उत्पादक व वितरक तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व वितरक कंपन्यानी त्यांचे वितरक राज्यभरात वाढवावेत तसेच उत्पादन व आयात वाढवावी, अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी दिल्या आहेत.

रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या दोन औषधांचे उत्पादक / आयातदार फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांचे उत्पादन राज्याबाहेर होते. रेमडेसीवरचे उत्पादन हेटेरो हेल्थकेअर, हैद्राबाद येथे होते. तर सिपला कंपनी गोव्यात उत्पादन करते. टोसीलीझुमॅबची आयात मे. रोश कंपनी करते तर मे. सिपला ही कंपनी वितरण करते.

पर्यायी औषधांचा सल्ला

टोसीलीझुमॅबचे पर्यायी औषध ईटियोझुलॅब हे मे. बायोकॉन या कंपनीने बाजारात आणले आहे. टोसीलीझुमॅबची आयात मर्यादीत असल्याने रुग्णांची हेळसांड होवू नये, यासाठी उपचार करताना ईटियोझुलॅब या पर्यायी औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्याने करावा असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

उपलब्ध औषधांची यादी प्रसिद्ध

महाराष्ट्रात मिळणाऱ्या या औषधाचा तपशील तसेच विक्रीचे तपशील घेण्याबाबत डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दर दिवशीच्या तपशीलावर ते स्वत: नजर ठेवून आहेत. तसेच गरजू रुग्णांना औषध कुठे उपलब्ध आहे याबाबत वितरकांची यादी प्रसिध्द केली आहे. औषधे उपलब्ध करुन देण्यास मदत करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केले जात आहे.

प्रत्यक्ष भेट आणि तपासणी

गेल्या आठ दिवसात जवळपास 10-11 रुग्णालयातील औषधी वितरण केंद्रांना डॉ. शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेट देवून काळाबाजार किंवा जास्त किंमत आकारणीबाबत स्वत: चौकशी केली. प्रत्येक रुग्णालयातील फार्मसीमध्ये टोसीलीझुमॅब या इंजेक्शनची विक्री एमआरपीवर न करता माफक नफा ठेवून रुग्णांना करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई व ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पीटल, भायखळा फार्मसी, मे.एस.के.एजन्सीज व सैफी रुग्णालय यांच्याकडून टोसीलीझुमॅबची माफक दरात विक्री केली जात आहे.

काळाबाजार प्रकरणी एफआयआर

रेमडीसीवर या औषधाचा काळाबाजार करण्याचे एक प्रकरण आढळून आले आहे. संबधिताविरुध्द पोलिसात प्रथम खबर अहवाल नोंदवण्यात आला असून, दोन आरोपींनी अटक करण्यात प्रशासन व पोलिसांना यश मिळाले आहे.

नवीन उत्पादन सुरु, औषध पुरवठ्यात वाढ

येत्या आठवडयात मे. मॉयलान ही कंपनी रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात आणणार आहे. तसेच मे. हेटेरो हेल्थकेअर, गुजरात येथील नवसारी येथे उत्पादन लवकरच सुरु करणार आहे. मे. सिपला ही सुध्दा गुजरात येथे उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे औषधांच्या पुरवठयात वाढ होणार आहे.

औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत

तुटवडा असलेल्या औषधांचा वापर आयसीएमआरच्या सूचना विचारात घेऊन वैद्यकिय सल्याने गंभीर रुग्णांसाठी करण्यात यावा, अशी सूचना डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री, राजेश टोपे यांना केली आहे. त्यांनी सदर बाब डॉक्टरांच्या टास्क फोर्समार्फत अंमलात आणण्यात येईल असे सांगितले आहे. या औषधांच्या काळाबाजारबाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर 1800222365 देण्यात यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.