ETV Bharat / state

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार - अमित देशमुख - Medical final year examination

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत परीक्षा घेण्यासंदर्भात घोषणा करू, असे सांगितले.

Medical final year exam announcement
वैद्यकीय अंतिम वर्ष परिक्षा घोषणा
author img

By

Published : Apr 12, 2021, 7:21 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेजच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत परीक्षा घेण्यासंदर्भात घोषणा करू, असे सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा

विद्यार्थ्यांचा आरोग्याची काळजी

कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात येत्या तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना

नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल, मात्र दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी पाहून राज्यपाल, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भातील पुढील तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्याशी पुन्हा चर्चा करू

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षासंदर्भात आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर अमित देशमुख यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू. यापूर्वीच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा - लोकांची काळजी घेणार, कुणालाही वार्‍यावर सोडणार नाही - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.