ETV Bharat / state

Measles Vaccination in Mumbai : मुंबईतील गोवरचे लसीकरण घटले, पालिका पुन्हा लसीकरण वाढवणार

मुंबईत गोवर रूग्णसंख्येत लसीकरणावर भर देण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा लसीकरणकाचे प्रमाण कमी झाले आहे. हे लसीकरण पुन्हा वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

Measles vaccination in Mumbai
मुंबईतील गोवरचे लसीकरण घटले
author img

By

Published : Feb 6, 2023, 10:00 PM IST

Updated : Feb 6, 2023, 10:14 PM IST

अपनालय संस्थेच्या वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर सुनिता चोरे माहिती देताना

मुंबई : मुंबईमध्ये गेल्यावर्षी गोवरचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार आटोक्यात येत असतानाच जानेवारी महिन्यात गोवरचे ५ मृत्यू झाले आहेत. तसेच सध्याचे दिवस गोवरला पोषक असल्याने तो वाढण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा लसीकरणकाचे प्रमाण कमी झाले आहे. हे लसीकरण पुन्हा वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईतील गोवरचा प्रसार : मुंबईत गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात गोवरचा प्रसार सुरु झाला. निश्चित निदान झालेले व संशयित रुग्ण यांची मोठ्या प्रमाणात नोंद होत होती. आतापर्यंत एकूण डिसेंबर पर्यंत ५७७ तर २०२३ मध्ये ६९ असे एकूण ६४६ रुग्ण आढळून आले आहेत. २०२२ मध्ये ताप आणि पुरळ असलेले ४६०१ तर २०२३ मध्ये ४३८ असे एकूण ५०३९ रुग्ण आढळून आले आहेत. आताप्र्यत्न २०२२ मध्ये गोवारमुळे २०२२ मध्ये १८ तर २०२३ मध्ये ५ असे एकूण २३ बालकांचा मृत्यू झाला आहे.

गोवरचे प्रमाण वाढण्याची भीती : मुंबईमध्ये गोवरचा प्रसार सुरु झाला तेव्हा मुस्लिम धर्मीय आणि झोपडपट्टीतील मुलांचे लसीकरण झाले नसल्याचे समोर आले होते. यासाठी पालिकेने मुस्लिम धर्मीय संस्था, धर्म गुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आदींची मदत घेतली होती. उर्दू बोलणाऱ्या डॉक्टरांची मदत घेऊन लसीकरण मोहीम राबवली होती. त्यामुळे सुरुवातीला लसीकरणाला वेग आला होता. मात्र डिसेंबर अखेरीला रुग्ण संख्या कमी झाल्याने नागरिकांनी पुन्हा लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. सध्याची परिस्थिती पोषक असल्याने गोवरचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. यामुळे याबाबत बैठक घेऊन लसीकरणावर भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्याचे गोमारे यांनी सांगितले.

लसीकणावर भर : मुंबईत दरवर्षी सुमारे १ लाख ३० हजार बालकांचा जन्म होतो. यामुळे लसीकरण करण्याच्या बालकांची संख्या बदलत असते. राज्य सरकारने आम्हाला १ लाख ७० हजार बालकांचे लसीकरण करण्याचे टार्गेट दिले आहे. मुंबईत जे मृत्यू होत आहेत त्यापैकी ५० टक्के लसीकरण न झालेले आहेत. सध्या ७५ टक्के लसीकरण झाले आहे. याआधी ५ तेर ६ टक्के लसीकरण होत होते. गेल्या काही महिन्यात ८ टक्के लसीकरण केले जात आहे, ते १० टक्क्यावर नेण्याचे आमचे नियोजन आहे. या गतीने आम्ही २ ते ३ महिने लसीकरण केले तर ९५ टक्के बालकांचे लसीकरण करणे शक्य आहे अशी माहिती गोमारे यांनी दिली.

लसीकरणासाठी मायक्रो प्लान : लसीकरणासाठी पालिका मायक्रो प्लान बनवत आहे. विभागात मुले किती आहेत. किती मुलांना लस देण्यात आली आहे. किती मुलांना लस द्यावी लागणार याची यादी आरोग्य कर्मचारी असलेल्या सीएचव्ही वर्कर यांच्याकडे असेल. त्या घरोघरी जाऊन दुसऱ्या दिवशी कोणाचे लसीकरण आहे त्याची माहिती पालकांना देतील त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढेल अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

मुलांना लस वेळेवर द्या : मुंबईत मागिले वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला गोवंडीमध्ये गोवरचा प्रसार वाढला. त्याठिकाणची परिस्थिती सुविधा पोषक नाहीत. लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने पालिका, धार्मिक नेते यांनी जनजागृती केली. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढले होते. लहान मुलांना लसीकरण केल्याने आजार लवकर आटोक्यात येतो. लस घेतली नसल्यास बालकांचे मृत्यू होतात. यामुळे आपल्या मुलांना लस वेळेवर द्यावी. गोवंडी सारख्या परिसरात शौचालय, स्वच्छ पाणी, टीबी सारखे आजार आहेत. याकडेही सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लसीकरणात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन "अपनालय" संस्थेच्या वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर (हेल्थ अँड डिसॅबिलिटी) सुनिता चोरे यांनी केले आहे.
हेही वाचा : Earthquake in Turkey : भूकंपाचे तीन शक्तिशाली धक्के! क्षणात होत्याचं नव्हतं झालं;पाहा व्हिडिओ

Last Updated : Feb 6, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.