ETV Bharat / state

Court Decision : महिलेचा विनयभंग केल्याने महिलेला एक वर्षाची शिक्षा ; माझगाव न्यायालयाचा निर्णय - विनयभंग प्रकरण

दोन वर्षांपूर्वी झालेल्या दोन मुलींच्या भांडणांमध्ये आरोपी महिलेला माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा तसेच 6 हजार रुपयांचा दंड ठोठावली (Mazgaon Court decision to sentence woman) आहे. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेविरोधात तक्रार नोंदवली (sentence woman to one year in molestation case) होती.

Court Decision
विनयभंग प्रकरणात महिलेला एक वर्षाची शिक्षा
author img

By

Published : Nov 29, 2022, 11:12 AM IST

मुंबई : दोन वर्षांपूर्वी झालेल्या दोन मुलींच्या भांडणांमध्ये आरोपी महिलेला माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा तसेच 6 हजार रुपयांचा दंड ठोठावली (Mazgaon Court decision to sentence woman) आहे. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेविरोधात तक्रार नोंदवली (sentence woman to one year in molestation case) होती. तक्रारीत मारहाण व विनयभंगाचा आरोप करण्यात आला, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

महिलेशी गैरवर्तनाचा गुन्हा : शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात एकीने दुसरीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याप्रकरणात महानगर दंडाधिकारी एम. व्ही. चव्हाण यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. ही तक्रार खोटी आहे. मुळात महिलेविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवता येत नाही. अशी तक्रार पुरूषाविरोधात नोंदवता येते, असा दावा बचाव पक्षाने केला. मात्र विनयभंगाच्या व्याख्येत तो किंवा ती असे वर्गीकरण होत नाही. महिलेशी गैरवर्तनाचा गुन्हा तो किंवा तीने केला असला तरी ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. महिला किंवा पुरुष असे वर्गीकरण करून शिक्षा दिली जात नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

शिक्षा ठोठावताना लिंगभेद नाही : मला सर्वांसमोर आरोपी महिलेने शिवीगाळ केली. माझे कपडे फाडले असा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. अशा प्रकरणात शिक्षा ठोठावताना लिंगभेद करता येत नाही. शिक्षा ठोठावताना लिंगभेद करावा असा कोणताच कायदा सांगत नाही, असे नमूद करत न्यायालयाने आरोपी महिलेला एक वर्षांची शिक्षा ठोठावली. एखाद्या महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेला शिवीगाळ केली. लज्जा वाटेल असे कृत्य केल्यास आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. हा गुन्हा पुरुषांविरोधात नोंदवला जातो. मात्र असा गुन्हा केवळ पुरुषाविरोधात नोंदवावा, असे या कलमात कुठेही नोंदवलेले (Mazgaon Court decision) नाही.

शिक्षा सुनावली : महिलेशी गैरवर्तन करणारा कोणीही असो महिला किंवा पुरुष, त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा देण्याची तरतूद आयपीसी कलम 354 मध्ये आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपी महिलेचा विवाह झाला आहे. तिला मूल आहे. त्यामुळे तिला केवळ एकच वर्षाची शिक्षा सुनावली जाते, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. या निकालामुळे महिलेने महिलेसोबत गैरवर्तन केल्यास ती शिक्षा पात्र ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण : आरोपी आणि तक्रारदार महिलेच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आणि भांडणे होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडण्यादरम्यान आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी एक चप्पल फेकली. आणि त्यानंतर दुसऱ्या चप्पलने तिच्या डोक्यावर मारले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपला गळा पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि आपले कपडे फाडले अशी तक्रार महिलेने या भांडणानंतर पोलिसांत दिली. त्यामुळे आरोपी महिलेने आपल्याला मारहाण करून विनयभंग केला तसेच कपडे फाडून वैयक्तिक जगण्याच्या अधिकाराचाही भंग केला. इतकंच काय तर भांडणात तिने आपल्या पतीला माझ्यावर बलात्कार करण्यासही सांगितले. यावेळी इमारतीतील सर्व पुरुष तेथे उपस्थित होते, असेही तक्रारदार महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले (Mazgaon Court decision to sentence woman) होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.