ETV Bharat / state

प्रवेश देत नाही म्हणून सीबीएसई, आयसीएसईच्या शिक्षकांना महापौर पुरस्कारातून डावलले का? - महापौर

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डच्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात नाही, म्हणून त्या शाळांमधील शिक्षकांचा 'महापौर शिक्षक पुरस्कारा'पासून डावलले का? असा प्रश्न महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला केला आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Aug 24, 2019, 9:47 AM IST

मुंबई - सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डच्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात नाही, म्हणून त्या शाळांमधील शिक्षकांचा 'महापौर शिक्षक पुरस्कारा'पासून डावलले का? असा प्रश्न महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला केला आहे. महापौर शिक्षक पुरस्कराची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद सुरू असताना महापौरांनी हा प्रश्न केला.

संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, शिक्षणाधिकारी महेश पालकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक हा शिक्षक असतो. दोन वर्षांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधील शिक्षकांना महापौर पुरस्कार देण्यात आले. ही पद्धत बंद का केली असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. त्या शिक्षकांना पुरस्कार का दिला नाही याबाबत मी स्वत: चौकशी करणार आहे. त्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल, असे महापौरांनी खडसावले. यावर शिक्षण समितीनेच नवीन पुरस्कार देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

कसा दिला जातो महापौर पुरस्कार

शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार्‍या यापुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारांसाठी १५० शिक्षकांची तोंडी परिक्षा घेण्यात आली. सलग तीन दिवस मुलाखत घेऊन ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अंतिम निवडीत २९ महिलांनी तर २१ पुरुषांनी पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे २८ मराठी शिक्षकांची यात निवड केली आहे. महापालिकेकडून त्यांना सन्मानचिन्ह, सुवर्णपदक आणि प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहे. अध्यापन पध्दत, विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा दर्जा, शिष्यवृत्ती परिक्षा, शिक्षणक्षेत्रातील बदल, १० वर्षे निष्कलंक सेवा, पटनोंदणी व गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखन कार्य, गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी विभागातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यात सहभाग आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंत, शिक्षण समिती अध्यक्षांसह पाच जणांची समिती नेमली होती. या समितीने शिक्षकांचे गुणदान करुन निवड केल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.

११ सप्टेंबरला पुरस्कार वितरण

महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या ‘महापौर शिक्षक’ पुरस्कारमध्ये यंदा मराठी शिक्षकांचा बोलबाला राहिला आहे. एकूण ५० पुरस्कारांपैकी मराठी २८ , हिंदी ८, ऊर्दू ७ तर इंग्रजी, गुजराती, तमीळ, कन्नड आदी भाषिकांमधील प्रत्येकी १ शिक्षकांचा यात समावेश आहे. मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहात सोमवारी (ता. ११ सप्टेंबर) पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

Intro:मुंबई - सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डच्या शाळांमध्ये तुमची ऍडमिशन केली जात नाहीत म्हणून त्या शाळांमधील शिक्षकांचा 'महापौर शिक्षक पुरस्कारा'पासून डावलले का ? असा प्रश्न महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला केला आहे. महापौर शिक्षक पुरस्कराची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद सुरु असताना महापौरांनी हा प्रश्न केला. Body:मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, शिक्षणाधिकारी महेश पालकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक हा शिक्षक असतो. दोन वर्षांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधील शिक्षकांना महापौर पुरस्कार देण्यात आले. ही पद्धत बंद का केली असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. त्या शिक्षकांना पुरस्कार का दिला नाही याबाबत मी स्वता चौकशी करणार आहे. त्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल असे महापौरांनी खडसावले. यावर शिक्षण समितीनेच नवीन पुरस्कार देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

कसा दिला जातो महापौर पुरस्कार -
शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार्‍या यापुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारांसाठी १५० शिक्षकांची तोंडी परिक्षा घेण्यात आली. सलग तीन दिवस मुलाखत घेऊन ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अंतिम निवडीत २९ महिलांनी तर २१ पुरुषांनी पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे २८ मराठी शिक्षकांची यात निवड केली आहे. महापालिकेकडून त्यांना सन्मानचिन्ह, सुवर्णपदक आणि प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहे. अध्यापन पध्दत, विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा दर्जा, शिष्यवृत्ती परिक्षा, शिक्षणक्षेत्रातील बदल, १० वर्षे निष्कलंक सेवा, पटनोंदणी व गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखन कार्य, गलिच्छ वस्ती व झोपडपट्टी विभागातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यात सहभाग आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंत, शिक्षण समिती अध्यक्षांसह पाच जणांची समिती नेमली होती. या समितीने शिक्षकांचे गुणदान करुन निवड केल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.

११ तारखेला पुरस्कार वितरण -
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या ‘महापौर शिक्षक’ पुरस्कारमध्ये यंदा मराठी शिक्षकांचा बोलबाला राहिला आहे. एकूण ५० पुरस्कारांपैकी २८ मराठी, हिंदी ८, मुस्लिम ७ तर ख्रिश्चन, गुजराती, तमीळ, कन्नड आदी भाषिकांमधील प्रत्येकी १ शिक्षकांचा यात समावेश आहे. मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहात सोमवारी (ता. ११ सप्टेंबर) पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

बातमीसाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्रकार परिषदेचे vis Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.