ETV Bharat / state

Matheran Train : माथेरानची राणी सुसाट, प्रवाशांचा उदंड प्रतिसाद - Matheran Train

पुणे आणि जवळच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान (matheran) हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन जी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. ती भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. पुनरागमन केलेल्या टॉय ट्रेन अर्थात नेरळ माथेरान ट्रेन हिला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

matheran train
माथेरानची राणी सुसाट
author img

By

Published : Nov 1, 2022, 3:50 PM IST

मुंबई: पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वेची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे. नेरळ ते अमन लॉज पर्यंत पर्वतांना वळण देणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली. 22 ऑक्टोबर 2022 रोजी या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. टॉय ट्रेनच्या (Toy train) सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून त्याला उदंड प्रतिसाद (overwhelming response from passengers) दिला आहे.

महसूलाची नोंद: 22 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत, व्हिस्टाडोममध्ये 229, प्रथम श्रेणीतील 378 आणि द्वितीय श्रेणीतील 3,091 अशा एकूण 3,698 व्यक्तींनी प्रवास करून रु.4,84,141/- च्या महसूलाची नोंद केली आहे. यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतून रु. 1,49,995/- इतका महसूल समाविष्ट आहे जो एकूण रकमेच्या जवळपास 31% आहे.

आरामदायी प्रवास: मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.

माथेरानचे नैसर्गिक वातावरण: मध्य रेल्वे माथेरान (matheran) हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होते.

माथेरान मिनी ट्रेन: माथेरान जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे नेरळ. पुणे-मुंबईहून रेल्वेने येणारे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरतात पण नेरळ पासून माथेरानला पोहोचायला पर्यटकांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागते. खासगी वाहनाने येण्यास पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागते तरी नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा अगदी किफायती दरात उपलब्ध आहे. माथेरान पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण किफायती दराच्या प्रवासासोबतचं पर्यटकांना मिनी ट्रेनच्या विशेष प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.