ETV Bharat / state

Matheran Toy Train : खुशखबर ! माथेरानच्या टॉय ट्रेनमध्ये वातानुकूलित सलून कोच जोडणार; तिकीट दर घ्या जाणून - एसी सलून कोच आठ आसनी असणार

माथेरान टॉय ट्रेन ही भारतभर प्रसिद्ध आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडणार आहे. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच हा आठ आसनी कोच असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध असेल.

Matheran Toy Train
माथेरान टॉय ट्रेन
author img

By

Published : Feb 3, 2023, 9:19 AM IST

मुंबई : नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. टॉय ट्रेनमध्ये एसी सलूनमधून प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभवच नाही तर निसर्ग जवळून पाहण्याची आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या शांततेत मग्न होण्याची संधी सुद्धा आहे. निसर्ग जवळून पाहण्यासाठी रेल्वेने ए किंवा बी आणि परतीसाठी सी किंवा डी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच आठ आसनी असणार आहे.

ट्रेनच्या वेळा : नेरळ ते माथेरान ट्रिप ए ही नेरळ येथून सकाळी 08.50 वाजाता सुटेल आणि माथेरान येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल. ट्रिप बीही नेरळ येथून सकाळी 10.25 वाजता सुटेल, माथेरान येथे दुपारी 01.05 सुटेल. माथेरान ते नेरळ ट्रिप सीही माथेरान येथून 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ येथे दुपारी 04.30 वाजता सुटेल. ट्रिप डीही माथेरान येथून दुपारी 04.00 सुटेल आणि नेरळ येथे संध्याकाळी 06.40 वाजता पोहचेल.

भाडे किती असेल : एकाच दिवशी राऊंड ट्रिपसाठी आठवड्यातील दिवशी ३२,०८८ रुपये, आठवड्याअखेरीस (वीकेंडला) ४४,६०८ रुपये, रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप आठवड्यातील दिवशी रु. ३२,०८८ अधिक १,५०० रुपये प्रति तास., आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४,६०८ रुपये करांसह डिटेंशन शुल्कासह १,८०० रुपये प्रति तास असे भाडे आकारले जाणार आहे. कोणीही ए किंवा बी आणि परतीसाठी सी किंवा डी यापैकी एक पर्याय निवडू शकतो.

अशी करा बुकिंग : निवडलेल्या प्लॅनच्या एकूण भाड्याच्या २० टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या ७ दिवस अगोदर १० हजार रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेवीसह एसी सलून बुक करू शकतात. उर्वरित ८० टक्के रक्कम प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाली असे मानले जाईल. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.

येथे संपर्क करा : मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर यू पी आय, पी ओ एस किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते. जर नेरळ व्यतिरिक्त इतर स्टेशनवर पैसे भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या १ दिवसाच्या आत कळवावे. अधिक माहितीसाठी, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.