मुंबई : गेल्या सात-आठ वर्षांमध्ये युग शास्त्र आणि योग अभ्यास या संदर्भात अनेक पाचवे केंद्र सरकारने उचलली आहेत. कार्यक्रमदेखील घोषित केले आहेत. योग अभ्यासाला जागतिक पातळीवर नेण्याचे देखील ठरवले. त्यामुळे अनेक ठिकाणी शालेय ते उच्च शिक्षण सर्व ठिकाणी याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आता मुंबई विद्यापीठामध्ये मास्टर इन संस्कृत योगशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.
मास्टर इन संस्कृत अभ्यासक्रम : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील संस्कृत हा विषय सर्व जनतेमध्ये पोहोचवावा या अनुषंगाने अनेक पातळीवर शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामार्फत 2023- 24 या वर्षापासून मास्टर इन संस्कृत योगशास्त्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. योगाकडे केवळ शारीरिक व्यायाम असे म्हणून दृष्टिकोन ठेवला जातो. मात्र, तो तेवढ्यापुरता न ठेवता त्याचा सुरेख आणि व्यापक विचार करायला पाहिजे या अनुषंगाने हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठांमध्ये सुरू होत आहे.
आंतरराष्ट्रीय परिसंवाद : मुंबई विद्यापीठांमध्ये योग सिद्धांत आणि योगाचे उपयोजन या महत्त्वाच्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद देखील केला गेला होता. त्या परिसंवादा दरम्यान विद्यापीठाने या मास्टर इन संस्कृत संदर्भात घोषणा देखील केल्या आहेत. योगशास्त्राचे मूल सिद्धांत संस्कृत भाषेमध्ये विद्यार्थ्यांना शिकता येईल. आजच्या काळाच्या अनेक संदर्भात त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये योगसूत्र असतील, हट्टयोग असतील, पतंजली योगसूत्र असतील असे विविध प्रकारचे जुने ग्रंथ देखील अभ्यासले जातील.
मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान : यासंदर्भात संस्कृत विभागाचे प्रमुख डॉक्टर शकुंतला गावडे यांनी सांगितले की, योगशास्त्राच्या सोबत मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान हे देखील विषय महत्त्वाचे आहे. केवळ शारीरिक स्वास्थ्य एवढ्या पुरतेच योगशास्त्र हे मर्यादित नाही तर यासोबत मानसिक व आध्यात्मिक शांती हे देखील त्यामध्ये अंतर्भूत आहे. त्या दृष्टीने समाजामध्ये विचार रुजण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्यावतीने विविध अभ्यासक्रम निश्चित केले जात आहे. संस्कृत विभागाच्यावतीने आता मास्टर इन संस्कृत योगशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे.
परिसंवाद आयोजित : मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत विभागाच्यावतीने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महत्त्वाचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादामध्ये प्रमुख पाहुणे मधुसूदन होते. जे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तसेच डॉक्टर गणेशराव व विशेष जातीची डॉक्टर मिकी मेहता ग्लोबल होलेस्टिक हेल्थ गुरु या सर्वांनीच मुंबई विद्यापीठातील मास्टर इन संस्कृत योगशास्त्र अभ्यासक्रम हा विषय सुरू होत असल्यामुळे त्याबाबत आनंद व्यक्त केला. योग सिद्धांताचा पाया बळकट करण्यासाठी या प्रकारचा अभ्यासक्रम अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.