ETV Bharat / state

विक्रोळीत विवाहितेची गळा दाबून हत्या; पती गजाआड

author img

By

Published : Jun 13, 2019, 6:56 PM IST

विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली आहे. पोलिसांनी संशयित पतीला केले अटक

मृत शीतल दळवी

मुंबई - विक्रोळी पार्कसाईट विभागात विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शीतल सचिन दळवी (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास शेजारच्या रहिवाशांना शीतल मृत अवस्थेत आढळून आली. तपासात तिची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन संशयित पतीला अटक केली.

शीतल दळवी ही पती सचिन दळवी (वय 34) व मुला सोबत विक्रोळी पार्क साईट विभागात रामनगर येथील कांबळे चाळीत एका भाड्याच्या खोलीत राहत होती. पती - पत्नीचे मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. पती सचिन हा बुधवारी सकाळीच घरातून बाहेर गेला होता. शीतलच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजारच्या राहिवाशांनी घरात डोकावून पाहिले. तर शीतल निपचित घरात पडून होती. शेजारच्यांनी नजीकच्या डॉक्टरला बोलावून तपासणी केली. त्यात डॉक्टरांनी शीतलला मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शेजारील नागरिकांनी पार्क साईट पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.

पार्कसाईट पोलिसांनी महिलेचा शव ताब्यात घेऊन तो राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केला. शवविच्छेदन करून रुग्णालयाने दिलेल्या अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पार्क साईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृत महिलेच्या पतीचा मोबाइल बंद होता. तसेच बुधवारी सकाळपासून घरी नसल्याने पोलिसांनी पती सचिन दळवी वर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी पतीला अटक केली असल्याचे माहिती पोलिसांनी दिली. पूढील तपास पार्क साईट पोलीस करीत आहेत.

Intro: विक्रोळीत विवाहितेची गळा दाबून हत्या पतीला अटक

 विक्रोळी पार्कसाईट विभागात विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख पटली असून शीतल सचिन दळवी वय 26 ही महिला घरात मृत अवस्थेत आढळून आली.बुधवारी दुपारी शेजारच्या रहिवाशांना मृत महिलेच्या घराचा दरवाजा खुला असल्याने घटना उघडकीस आली. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन संशयित पतीला अटक केलीBody: विक्रोळीत विवाहितेची गळा दाबून हत्या पतीला अटक

 विक्रोळी पार्कसाईट विभागात विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख पटली असून शीतल सचिन दळवी वय 26 ही महिला घरात मृत अवस्थेत आढळून आली.बुधवारी दुपारी शेजारच्या रहिवाशांना मृत महिलेच्या घराचा दरवाजा खुला असल्याने घटना उघडकीस आली. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन संशयित पतीला अटक केली .

मयत शीतल दळवी ही पती सचिन दळवी वय 34 व मुला सोबत विक्रोळी पार्क साईट विभागात रामनगर येथील कांबळे चाळीत एका भाड्याच्या खोलीत राहत होती.पती पत्नीचे मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. पती सचिन हा बुधवारी सकाळीच घरातून बाहेर गेला होता. मयत शीतलच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजारच्या राहिवाश्यांनी घरात डोकावून पाहिले तर शीतल घरात निपचित पडून होती राहिवाश्यांनी बाजूच्या स्थानिक डॉक्टरला बोलावून तपासणी केली तेंव्हा डॉक्टर यांनी मयत असल्याचे सांगितले तेंव्हा शेजारील नागरिकांनी पार्क साईट पोलिसाना माहिती दिली.
पार्कसाईट पोलिसानी महिलेचा शव ताब्यात घेऊन तो राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केला. व शवविच्छेदन करून रुग्णालयाने अहवाल दिला यात महिलेचा गळा दाबून हत्या केली असल्याची माहिती दिली या प्रकरणी पार्क साईट पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल केला. मयत महिलेच्या पतीचा मोबाइल बंद व बुधवारी सकाळपासून घरी नसल्याने पोलिसानी पती सचिन दळवी वर संशय व्यक्त केला होता.या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असल्याचे माहिती दिली.अधिक तपास पार्क साईट पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.