ETV Bharat / state

Marine Aqua Zoo : मरीन अ‍ॅक्वा झूमधून चक्क प्राणी चोरीला, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - झू चे ट्रस्टी पृथ्वीराज पवार

Marine Aqua Zoo : दादर पश्चिमेतील मरीन अ‍ॅक्वा झू इथून प्राणी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Marine Aqua Zoo
Marine Aqua Zoo
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 9:41 AM IST

मुंबई Marine Aqua Zoo : दादर पश्चिमेत असलेल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वीच मगरीचे पिल्लू आढळले होते. ते मगरीचे पिल्लू मरीन अ‍ॅक्वा झू मधील असल्याचं वन्य अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत समोर आलं होतं. याप्रकरणानंतर पुन्हा एकदा मरीन अ‍ॅक्वा झू प्राणी चोरीला गेल्यामुळं चर्चेत आलंय. याप्रकरणी मरीन अ‍ॅक्वा झू चे ट्रस्टी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर चोरीला गेलेल्या सर्व प्राण्यांची किंमत चार लाख 55 हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

तक्रारीत काय म्हटलंय : दादर मधील मरीन अ‍ॅक्वा झूचे ट्रस्टी पृथ्वीराज पवार यांनी शिवाजी पार्क पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, मरिन अ‍ॅक्वा झु प्राणी संग्रालय हे सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सुरू असते. तसंच मी दररोज दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्राणी संग्रालयात असतो. 31 ऑक्टोबरला सकाळी 9.00 वाजता सोमया विद्याविहार कॅम्पस स्कुल इथं प्राणी प्रदर्शन होतं. म्हणून मी मरिन अ‍ॅक्वा झु प्राणी संग्रालय येथुन प्रदर्शनासाठी प्राणी घेवून जाण्यासाठी सकाळी 7.30 वाजता पोहचलो असता तिथं असलेले 6 अजगर, विदेशी प्रजातीचे 2 घोरपड, विदेशी प्रजातींचे पाल, विदेशी प्रजातीची सरडा, विदेशी प्रजातीचे प्राणी त्यांना कंपाउंडमध्ये मिळून आले नाहीत. असं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

कंपाऊंडमध्ये प्रवेश करत चोरी : मरीन अ‍ॅक्वा झूचे ट्रस्टी पवार यांना हरवलेल्या प्राण्यांचा आजुबाजुला शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत. तेव्हा कोणीतरी कंपाऊंडमध्ये प्रवेश करून प्राणी चोरी केल्याचं लक्षात आलं. यानंतर पवार यांनी मरिन अ‍ॅक्वा झु प्राणी संग्रालयाचे प्रेसिडेंट युवराज नंदकुमार मोघे यांना याची माहिती दिली. याप्रकरणी पवार आणि मोघे यांनी मुंबई पोलीस हेल्पलाइन नंबरवर कॉल केला असता त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं. यानंतर ट्रस्टी पृथ्वीराज पवार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कालीय. 30 ऑक्टोबर रात्री अकरा ते 31 ऑक्टोबर सकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान प्राणी चोरण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय तक्रारदार पवार यांनी वर्तवलाय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनश्री सोनवणे यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Zoo Authority Animal Deaths : राज्यातील 56 प्राणी संग्रहालयातील 200 प्राण्यांचा मृत्यू , पुण्याचा क्रमांक तिसरा
  2. World Tiger Day : प्राणी संग्रहालयात रंगला वाघांच्या बछड्यांची नावे ठेवण्याचा कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांनी ठेवली वाघांची नावे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.