ETV Bharat / state

Marathwada Cabinet Meeting : मराठवाडा दौऱ्यात 'युवराज' आमदारानं मागवलं हैदराबादवरून बर्गर, कोल्ड कॉफी - Marathwada Cabinet Meeting

मराठवाड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या खर्चावरून विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. दुसऱ्याबाजूला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या 'युवराज' आमदाराचा खळबळजनक खुलासा केलाय.

Marathwada Cabinet Meeting
Marathwada Cabinet Meeting
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 7:26 PM IST

Updated : Sep 16, 2023, 8:04 PM IST

नरेश मस्के यांची पत्रकार परिषद

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विरोधकांनी राज्यसरकारवर टीकेची झोड उठवलीय. सरकारनं केलेल्या वारेमाप खर्चाचा देखील विरोधकांनी समाचार घेतलाय. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तब्बल सात वर्षांनंतर ही बैठक होत असल्यानं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. या बैठकीच्या निमित्तानं राज्य सरकारचे सर्व 29 मंत्री, 400 अधिकाऱ्यांचा ताफा संभाजीनगर (औरंगाबाद) दाखल झाला होता. या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. तिथंच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली असून मंत्र्यांच्या जेवणाच्या हजारे रुपय खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनं केली जनतेच्या पैशांची उधळपट्टी : रविवारी मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पार पडली. यावेळी राज्य सरकारनं जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलाय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यसरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नसून केवळ तीन लोकांचं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

हैदराबादहून कोल्ड कॉफी मागवली : 'युवराज आदित्य ठाकरे' मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना कोल्ड कॉफी, बर्गर हवं होतं. त्यामुळं हैदराबादहून कोल्ड कॉफी, बर्गर आणावं लागलं, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात होते. मात्र इंडिया आघाडीची बैठक कुठे होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. खासदार संजय राऊत आता पत्रकारिता विसरून पवारांच्या ताटाखालचं मांजर बनल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. त्यांना पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावलाय. संजय राऊत यांच्या पत्रकारितेनं आनंद दिघेंना टाडा लागला होता अशी आठवण देखील नरेश म्हस्के यांनी करून दिली.

शिवसेने तर्फे श्रीगणेश दर्शन 2023 स्पर्धा : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिकवणीनुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरात प्रथमच श्री गणेश दर्शन स्पर्धा 2023 चं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली. सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक वळण मिळावं, तसंच समाजप्रबोधनाचं, हिंदुत्व, राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दिनांक 16 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत बाळासाहेब भवन, नरिमन पॉईंट, मुंबई तसंच शिवसेनेच्या सर्व स्थानिक शाखांमध्ये उपलब्ध असतील.

प्रथम पारितोषिक 5 लाख : श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2023 ही मुंबई शहरातील गणेशोत्सव मंडळांपुरती मर्यादित आहे. सर्वोत्कृष्ट गणेशमूर्ती, सर्वोत्कृष्ट सजावट, सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य अशा तीन प्रकारात मंडळांना पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक रु. 5 लाख द्वितीय पारितोषिक रु. 3 लाखासह स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 2 लाख, प्रोत्साहन (50) प्रत्येकी 5 हजार रुपयासह स्मृतिचिन्ह प्रदान केले जाईल. याशिवाय इतर प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जातील.

हेही वाचा -

  1. Cabinet Meeting : मराठवाड्याला मुख्यमंत्र्यांनी दिलं मोठं गिफ्ट, विकासासाठी 600 कोटींची घोषणा
  2. Lok Sabha Elections : शिर्डी लोकसभेच्या तिकिटाचा प्रसाद कोणाला मिळणार?
  3. Devendra Fadnavis : सत्तेत असताना माशा मारल्या का? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Last Updated : Sep 16, 2023, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.