ETV Bharat / state

आर.एम.भट हायस्कूलमध्ये 'मराठीप्रेमी पालक महासंमेलन'; मराठी टिकविण्यासाठी काढली जागर फेरी

महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार असून चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत आणि मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऱ्या ‘मराठी शाळांच्या सदिच्छादूत’ अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

author img

By

Published : Dec 14, 2019, 11:44 AM IST

mumbai
जागर फेरीचे दृश्य

मुंबई- परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे दोन दिवसीय 'मराठीप्रेमी पालक महासंमेलन' आयोजित करण्यात आले आहे. मराठी शाळा टिकून राहाव्या तसेच मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा हा या संमेलनामागचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आज ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित करण्यात आली होती.

माहिती देताना मराठीप्रेमी पालक महासंम्मेलनाचे समन्वयक आनंद भंडारे

'मराठी शाळा जागर फेरी' ची कामगार मैदान येथून सुरुवात झाली. यात आर.एम. भट, शिरोडकर, सोशल सर्विस लीग, नवभारत, सुदंत्ता, शिवाजी विद्यालय यांचा समावेश होता. गिरणगावातील शिवाजी विद्यालय या मराठी विद्यालयातील जवळपास ५०० विद्यार्थी या जागर फेरीत सहभागी झाले होते. मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर.एम. भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या संयुक्त विद्यमानाने या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार असून चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत आणि मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऱ्या ‘मराठी शाळांच्या सदिच्छादूत’ अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि डायरेक्टर जनरल मा. डॉ. एम. एस. गोसावी हे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आहेत.

ग्रंथ आणि शाळा उपक्रमांचे प्रदर्शन

महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा सातत्याने शिक्षणाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळांचे योगदान समाजासमोर यावे आणि शिक्षणातील त्यांच्या प्रयोगांचे आदानप्रदान व्हावे या हेतूने मुंबई आणि मुंबई बाहेरील प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक आणि शालबाह्य विषयांवरील ग्रंथप्रदर्शन या संमेलनात असणार आहे. १४ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत पालक व शिक्षक आणि मराठीप्रेमी यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. मी माझ्या पाल्याला मराठी शाळेत का घातले? (पालकांसाठी) मराठी शाळांचे वैभव प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल? मराठी शाळा का टिकवायच्या आणि कशा? (खुला गट) या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.

हेही वाचा- 'आम्हाला सोडून गेलेल्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नाही'

Intro:मुंबई |

मुंबईतील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांच्या बाजूने पालक उभे राहावे आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आज पासून सुरू होणार हे या संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यासाठी आज ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित करण्यात आली होती. कामगार मैदान येथून सुरू झालेल्या या मराठी शाळांच्या जागरात आर एम भट, शिरोडकर, सोशल सर्विस लीग, नवभारत, सुदंत्ता, शिवाजी विद्यालय या गिरणगावातील मराठी शाळांमधील जवळपास पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. Body:मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार असून चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत आणि मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऱ्या ‘मराठी शाळांच्या सदिच्छादूत’ अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि डायरेक्टर जनरल मा. डॉ. एम. एस. गोसावी हे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा सातत्याने शिक्षणाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळांचे योगदान समाजासमोर यावे आणि शिक्षणातील त्यांच्या प्रयोगांचे आदानप्रदान व्हावे या हेतूने मुंबई आणि मुंबई बाहेरील प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक आणि शालाबाह्य विषयावरील ग्रंथप्रदर्शन ही या संमनेलनात असणार आहे. १४ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत पालक व शिक्षक आणि मराठीप्रेमी यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. मी माझ्या पाल्याला मराठी शाळेत का घातले? (पालकांसाठी) मराठी शाळांचे वैभव प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल? मराठी शाळा का टिकवायच्या आणि कशा? (खुला गट) या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.