दुबई INDW vs PAKW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. परिणामी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताला अद्याप महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद मिळालेलं नाही. यावेळी भारतीय संघ चांगली तयारी करुन T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी निघाली आहे. पण पहिल्याच सामन्यात निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. आता रविवारी 6 ऑक्टोबरला भारतीय संघाचा पाकिस्तानशी मोठा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभव विसरत भारतीय संघाची नजर या सामन्यात विजय मिळवण्याकडे असेल.
The #T20WorldCup journey begins for #TeamIndia 🤩
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
Drop your wishes in the comments for the #WomenInBlue 💙✍️ pic.twitter.com/NgLb9uExgQ
पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाचा वरचष्मा : भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 15 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघानं 12 आणि पाकिस्तानी महिला संघानं फक्त 3 जिंकले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ T20 मध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढं आहे आणि वरचढ आहे. तर महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघानं 5 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. शेवटच्या वेळी दोन्ही संघ 2022 च्या T20 विश्वचषकात आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघानं 7 विकेट्सने सामना जिंकला होता.
दारुण पराभवामुळं भारतीय संघाचा नेट रनरेट ढासळला : महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ गट-अ मध्ये आहे. या गटात भारताशिवाय पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियन संघ आहेत. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट -2.900 आहे, जो खूप वाईट आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना रविवार, 6 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघ :
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता , आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना
पाकिस्तान महिला संघ : मुनिबा अली (यष्टिरक्षक), गुल फिरोझा, सिद्रा अमीन, निदा दार, फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, तुबा हसन, सदफ शमास, नशरा संधू, डायना बेग, इरम जावेद, ओमामा सोहेल, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब
हेही वाचा :