मुंबई - राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून पहिली व सहावी या वर्गांसाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा जीआर आज (सोमवारी) शालेय शिक्षण विभागाने जारी केला. या जीआरमुळे राज्यात असलेल्या केंद्रीय मंडळाच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज आदी मंडळाच्या व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे अनिवार्य होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक ट्वीट करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा जीआर काढण्यात आला असल्याची माहिती दिली.
राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीच्या या दोन वर्गांत मराठी भाषा विषय सक्तीचा केला जाणार असून पुढील वर्षी २०२१-२२मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३ मध्ये तिसरी आणि आठवी, २०२३-२४ मध्ये चौथी आणि नवीन तर पाचवी आणि दहावीमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात लागू केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या या शाळांमध्ये मराठी विषय आणि त्याचा अभ्यासक्रम आराखडा हा राज्य शिक्षण मंडळाच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असणार आहे.
राज्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी ११ मे रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मराठी भाषा विकासमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला होता. यात बालभारतीकडून मराठी भाषेसाठी वर्गवार अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यासंदर्भातील पूर्वतयारी कशी केली जात आहे, याचे सादरीकरण करण्यात आले होते.
'आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची' - Marathi langauge compulsion in english schools
राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि सहावीच्या या दोन वर्गांत मराठी भाषा विषय सक्तीचा केला जाणार असून पुढील वर्षी २०२१-२२मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३मध्ये तिसरी आणि आठवी, २०२३-२४मध्ये चौथी आणि नवीन तर पाचवी आणि दहावीमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात लागू केला जाणार आहे.
!['आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची' Education Department Resolution](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-05:53-mh-mum-01-educa-mini-var-gr-twee-7201153-01062020175235-0106f-1591014155-874.jpg?imwidth=3840)