मुंबई - कोरोना विषाणूने अनेकांच्या जीवनाची घडी बिघडवली असून अनेक जण या आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. मनोरंजनसृष्टीतही या आजाराने बरेच बळी घेतले. गेल्याच आठवड्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले. आता कोरोनाच्या विळख्यात अजून एक मराठी अभिनेता आला असून त्याला देवाज्ञा झाली आहे. ‘दशक्रिया', 'बंदिशाळा' या गाजलेल्या चित्रपटात भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र पालवे यांचे कोरोना आजाराने निधन झाले.
हेही वाचा - राज्यात 24 तासांत 71 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त
पालवे यांचे नाशिक येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते गेले दोने एक आठवडे नाशिकमध्ये एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. प्रख्यात लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्यासोबत 'दशक्रिया', 'बंदिशाळा' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. 'बंदिशाळा' या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते. तसेच, गेली ३० वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने ते संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे सहाय्यक लेखक म्हणून काम करीत होते. अभिनेते पुंडलिक रामचंद्र पालवे यांच्या आत्म्यास शांती प्रदान हो, ही प्रार्थना.
हेही वाचा - दिलासादायक.. राज्यात सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त