ETV Bharat / state

ईशान्य मुंबईत मराठा युवा मोर्चा आणि आगरी, कोळी बांधवांचा राष्ट्रवादीला पाठिंबा - aagri koli community

ईशान्य मुंबईतून मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवार म्हणून नेहा कुऱ्हाडे निवडणुकीसाठी उभ्या असल्या तरी संजय पाटील यांना आमचा पाठिंबा असणार आहे, असे मत यावेळी मराठा युवा मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केले.

आगरी कोळी बांधव यांचा राष्ट्रवादीच्या संजय पाटलांना पाठिंबा
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:53 AM IST

मुंबई - ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाज बांधवांकडून राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भांडुप येथे पत्रकार परिषद घेवून मराठा समाज आणि आगरी कोळी बांधव यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजांचे बळ मिळणार आहे.

मराठा समाजाची वस्ती मोठया प्रमाणात घाटकोपर भटवडी ,भांडुप, काजूरमार्ग,विक्रोळी पार्क साईट येथे आणि आगरी कोळी बांधव यांचे वस्ती, भांडुप, कंजूरमार्ग, नाहूर गाव, मुलुंड पूर्व येथे असल्याने आघाडीच्या उमेदवारास बळ मिळणार आहे. भांडुप पश्चिम येथील बँकेट हॉल येथे दोन्ही समाजाच्या स्थानिक नागरिकांनी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार असल्याचे पत्रक दिले.

मराठा युवा मोर्चा आणि आगरी कोळी बांधव यांचा राष्ट्रवादीच्या संजय पाटलांना पाठिंबा

यावेळी मराठा युवा मोर्चाचे समन्वयक बिपीन विचारे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या हक्कासाठी तरुणांनी मागील वर्षी जे लाखोंचे मोर्चे राज्यभर काढले, त्या पैकी एक मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. तेव्हा संजय दीना पाटील यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तसेच न्यायालयात मोर्चामधील मुलांना जामीन मंजूर करण्यासाठी सहकार्य केले. हा एकच हेतू ठेवून आम्ही ईशान्य मुंबईत संजय पाटील यांच्यासोबत आहोत. यावेळी दुसरे समन्वयक संपतराव सूर्यवंशी म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवार ईशान्य मुंबईतून नेहा कुऱ्हाडे निवडणुकीसाठी जरी उभ्या असल्या तरी संजय पाटील यांना आमचा पाठिंबा असणार आहे. आमचे राज्यातील कोणत्याही पक्षासोबत मतभेद नाहीत. त्यामुळे आम्ही केवळ ईशान्य मुंबईतील संजय पाटील यांना पाठिंबा देत आहोत.

दरम्यान, यावेळी आगरी कोळी बांधव यांच्या तर्फे भारदाज चौधरी यांनी पाठिंबा देत संजय पाटील यांच्याकडे त्यांच्या मागण्या पुर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आगरी कोळी बांधव यांच्या मागण्या -
- मुंबईतील कोळीवाडा पुनर्विकास कोस्टल रोडचे काम रद्द करण्यात यावे.
- भूसंपादन कार्यात एमएमआरडीएच्या अंर्तगत येणाऱ्या गावांना पाचपट मोबदला देण्यात यावा. यासाठी भूमापन कायद्यात सुधारणा करावी.
- प्रकल्पग्रस्त वारसांना हक्काने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे.
- प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षणाच्या तरतूदींसाठी संसदेत कायदा बनवण्यात यावा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
यावर संजय पाटील पाठिंबा देण्याऱ्यांचे आभार मानून, माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी कोठेही तडा न जाऊ देत माझा पक्ष आणि नेते कायम तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

Intro:ईशान्य मुंबईत मराठा युवा मोर्चा आणि आगरी कोळी बांधव यांचा पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना पाठिंबा

ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाज बांधवाकडून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भांडुप येथे पत्रकार परिषद घेवून मराठा समाज आणि आगरी कोळी बांधव यांचे कढून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे बळ मिळणार आहे.मराठा समाजाची वस्ती मोठया प्रमाणात घाटकोपर भटवडी ,भांडुप, काजूरमार्ग,विक्रोळी पार्क साईट येथे आणि आगरी कोळी बांधव यांचे वस्ती ,भांडुप ,कंजूरमार्ग, नाहूर गाव, मुलुंड पूर्व येथे असल्याने आघाडीच्या उमेदवारास बळ मिळणार आहेBody:ईशान्य मुंबईत मराठा युवा मोर्चा आणि आगरी कोळी बांधव यांचा पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना पाठिंबा

ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाज बांधवाकडून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भांडुप येथे पत्रकार परिषद घेवून मराठा समाज आणि आगरी कोळी बांधव यांचे कढून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे बळ मिळणार आहे.मराठा समाजाची वस्ती मोठया प्रमाणात घाटकोपर भटवडी ,भांडुप, काजूरमार्ग,विक्रोळी पार्क साईट येथे आणि आगरी कोळी बांधव यांचे वस्ती ,भांडुप ,कंजूरमार्ग, नाहूर गाव, मुलुंड पूर्व येथे असल्याने आघाडीच्या उमेदवारास बळ मिळणार आहे.

भांडुप पश्चिम येथील बँकेट हाल येथे दोन्ही समाजाचे स्थानिक नागरिक यांनी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार असल्याचे पत्रक दिले यावेळी मराठा युवा मोर्चाचे समन्वयक बिपीन विचारे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या हक्का साठी तरुणांनी मागील वर्षी जे लाखोंचे मोर्चे राज्यभर काढले त्या पैकी एक मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. तेंव्हा संजय दीना पाटील यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तसेच न्यायालयात मोर्चामधील मुलांना जामीन मंजूर करण्यासाठी सहकार्य केले हा एकच हेतू ठेवून आम्ही ईशान्य मुंबईत संजय पाटील यांच्या सोबत आहोत. यावेळी दुसरे समन्वयक संपतराव सूर्यवंशी म्हणाले आमचा मराठा क्रांती मोर्चा चा उमेदवार ईशान्य मुंबईतून नेहा कुऱ्हाडे निवडणूक साठी जरी थांबल्या असल्या तरी संजय पाटील यांना आमचा पाठिंबा असणार आहे. आमचा राज्यातील कोणत्याही पक्षा सोबत मतभेद नाहीत. त्यामुळे आम्ही केवळ ईशान्य मुंबईतील संजय पाटील यांना पाठिंबा देत आहोत असे समन्वय म्हणाले.
यावेळी आगरी कोळी बांधव यांच्या तर्फे भारदाज चौधरी यांनी सांगितले की आमच्या मागण्या संजय पाटील मान्य करतील.
यावेळी संजय पाटील म्हणाले मला जो पाठिंबा देण्यात आला आहे. त्याला मी कोठेही तडा न जाऊ देत माझा पक्ष आणि नेते कायम तुमच्या सोबत असणार आहेत .

आगरी कोळी बांधव यांच्या मागण्या

मुंबईतील कोळीवाडा पुनर्विकास कोस्टल रोड चे काम रद्द करण्यात यावे

भूसंपादन कार्यात एमएमआरडीएच्या अंर्तगत येणाऱ्या गावांना पाचपट मोबदला देण्यात यावा यासाठी भूमापन कायद्यात सुधारणा करावी

प्रकल्प ग्रस्त वारसांना हक्काने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षणाची तरतूदी साठी संसदेत कायदा बनवण्यात यावा आणि इतर Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.