ETV Bharat / state

मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षणासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित - mumbai

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी छेडलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षणासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित
author img

By

Published : May 6, 2019, 8:14 PM IST

मुंबई - मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी छेडलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. तर ४ दिवसात प्रश्न न सुटल्यास राज्यभर आंदोलन करू, असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला.

मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षणासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज विद्यार्थी निषेध करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. यावेळी आझाद मैदानात निदर्शने देखील करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिष्ठमंडळ वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. शुक्रवारपर्यंत सरकारला वेळ देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य संचालक तात्याराव लहाने यांच्याबरोबर मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची उद्या सकाळी साडेदहा वाजता या प्रश्नावर होणार बैठक होणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाही. मात्र, शुक्रवारपर्यंत निर्णय न आल्यास राज्यभरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे मराठा विद्यार्थी आझाद मैदानात दाखल होऊन आंदोलन छेडणार आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

  • काय आहे प्रकरण-

राज्य सरकारने मराठा आरक्षण लागु केले. मात्र, त्याचा फायदा वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मिळत नाही. इएसबीसी गटातून या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला होता. परंतु नागपूर खंडपीठाने या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज आझाद मैदानात निदर्शन केले. तर मुख्यमंत्र्याची भेटही घेतली. जर या विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय लागला नाही, तर २५० विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार आहे.

Intro:मुंबई ।

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी छेडलेलं आंदोलन तात्पुरते स्थगित केलं आहे. 4 दिवसात प्रश्न न सुटल्यास राज्यभर आंदोलन करू, असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला.Body:आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी निषेध करण्यासाठी आले होते. आझाद मैदानात निदर्शनेदेखील करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या बैठकित मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पाहणार वाट पाहणार आहोत. शुक्रवारपर्यंत सरकारला वेळ देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य संचालक तात्याराव लहाने यांच्याबरोबर मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची उद्या सकाळी साडेदहा वाजता या प्रश्नावर होणार बैठक होणार आहे.

आचार संहिता असल्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाही. पण शुक्रवार पर्यंत निर्णय न आल्यास राज्यभरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे मराठा विद्यार्थी आझाद मैदानात दाखल होऊन आंदोलन छेडणार आहेत.

काय आहे प्रकरण
मराठा आरक्षण राज्य सरकारने लागु केले. पण त्याचा फायदा वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मिळत नाही आहे. इएसबीसी गटातून या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला होता. परंतु नागपूर खंडपीठाने या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असे सांगितले होते. यामुळे हे प्रवेश रद्द होत या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. आज या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात निदर्शन केली. मुख्यमंत्री यांची भेटदेखील घेतली. जर निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला नाही तर 250 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.