मुंबई: मुंबईच्या नाना चौकातील स्काय वाॅकच्या छतावर एक व्यक्ती ड्रगची नशा करुन (after being drugged) चढला. तो आत्महत्या करत आहे असे पाहुन पाहणाऱ्यांच्या ऱ्हदयाचे ठोके चुकले स्काय वाॅकच्या खाली लोक मोठे कापड घेऊन त्याला झेलन्यासाठी उभे राहीले. दरम्यान (man who climbed onto the roof of a skywalk) गावदेवी पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांसह तेथे पोचले त्यांनी नाट्यमय आणि थरारक पद्धतीने त्याला पडण्यापासून वाचवल्याचे (was rescued in a thrilling manner) समोर आले आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबईतील स्कायवॉकच्या छतावर एक 24 वर्षीय व्यक्ती बुधवारी अंमली पदार्थांच्या नशेत चढला. त्याला वाचवण्यासाठी सकाळपासूनच्या नाट्यमय पहायला मिळाल्या अधिकाऱ्यांनी त्यालाखाली उतरण्यासाठी थरारक प्रयत्न केले. प्राप्त माहिती नुसार शकील अहिया असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो छताच्या काठावर उभा होता. हे पाहून अधिकारी हळुच त्याच्याजवळ पोचले तो मात्र तिथून खाली उतरण्याचा प्रयत्न करत राहिला. एका अधिकाऱ्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत हळूच त्याच्या जवळ जाऊन त्याला पकडले. त्यांनी त्याला दुसऱ्या बाजूला ओढले आणि छतावर नेले. हे बचावकार्या सुमारे दोन तास सुरु होते.
शकील अहिया याने उडी मारू नये यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली. ग्रँट रोड स्टेशन रोड ओव्हर ब्रिज वरील स्कायवॉकवरून त्याने उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी शेवटी त्याला पकडले. रात्री उशिरापर्यंत तो अहिया पोलिस ठाण्यातच होता. त्याच्या रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबई झोन-2 चे डीसीपी नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी हा माणूस ड्रग्जच्या प्रभावाखाली होता. त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ सुनील शिंदे यांच्याशो संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, अमली पदार्थ सेवन केल्यावर आपले नियंत्रण सामान्यतः हरवते. त्या स्थितीत माणूस काहीही करू शकतो. त्याची जाणीव काही काळ हरवते. अश्यावेळी योग्य उपचार हाच पर्याय असतो.