ETV Bharat / state

Mumbai Crime News:  'त्या' खून प्रकरणामागे लव्ह, सेक्स अन् धोका...प्रियकर झाला हैवान! - मुंबईत लिव्ह इन पार्टनरची हत्या

मुंबईतील मीरा रोड येथे एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याचा आरोप आहे. या आरोपीने मृतदेहाचे अनेक तुकडे केले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Mumbai Crime News
लिव्ह इन पार्टनरची हत्या
author img

By

Published : Jun 8, 2023, 7:44 AM IST

Updated : Jun 8, 2023, 7:00 PM IST

मुंबईत लिव्ह इन पार्टनरची हत्या

मुंबई : एका 56 वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. मीरा रोड परिसरातील इमारतीत सरस्वती वैद्य आरोपीसह तीन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महिलेचा वार करून खून : प्राथमिक तपासात महिलेचा वार करून खून करण्यात आल्याचे मानण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. सरस्वती वैद्य (३२) असे पीडित महिलेचे नाव आहे, ती तिच्या ५६ वर्षीय साथीदार मनोज सानेसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३ वर्षांपासून राहत होती, असे मुंबईचे डीसीपी जयंत बजबळे यांनी सांगितले. बुधवारी नयानगर पोलिस ठाण्याला इमारतीतील रहिवाशांचा फोन आला, ज्यामध्ये या दाम्पत्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

  • #WATCH | Maharashtra | 32-year-old woman killed by 56-year-old live-in partner | As per Police, the accused Manoj Sahni killed Saraswati Vaidya 3-4 days back and after that, he purchased a tree-cutter to chop her into pieces. Police say that the accused boiled pieces of her body… pic.twitter.com/ilFUfWVOLY

    — ANI (@ANI) June 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन दिवस मृतदेहाची लावत होता विल्हेवाट : ३ जून रविवारी मध्यरात्री सरस्वती या मनोज वरती संशय घेत असल्याच्या कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने मनोज यांनी सरस्वतीची निर्घृण हत्या केली, असे मानण्यात येत आहे. त्यानंतर मागील तीन दिवस मृतदेह घरात ठेवून शरीराचे तीन तुकडे करण्यात आले. यामध्ये काही मृतदेहाचे अवशेष शिजवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतदेहाचे काही अवशेष गायब केल्याचे आढळून आले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले. त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचे 12-13 पेक्षा जास्त तुकडे सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

खासदार सुळे यांनी केली आरोपीच्या फाशीची मागणी- हत्येतील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा करावी, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मागी केली आहे. मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे खासदार सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तपासयंत्रणांनी गांभीर्य तपास करावा, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.

  • मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.

    गुन्हेगारांना या राज्यात…

    — Supriya Sule (@supriya_sule) June 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृतदेहाचे गायब झालेले अवशेष : सरस्वती यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आरोपी मनोज साने याला पोलिसांनी अटक जरी केली असली, तरी मात्र मृतदेहाचे गायब झालेले अवशेष शोधणे हे पोलिसांसाठी एक आव्हान असणार आहे. नेमके या प्रकरणात काय काय खुलासे बाहेर येणार हे काळ सांगेल. मात्र या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. दोघांमध्ये भांडणाच्या कारणावरून महिलेची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मीरा रोड परिसरातील एका सोसायटीतून महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. येथे एक जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. महिलेचा वार करून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे- पोलीस उपायुक्त (डीसीपी) जयंत बजबळे

श्रद्धा वालकर हत्याकांड : काही दिवसांपूर्वी असेच श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण समोर आले होते. ज्यात तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. आफताब पूनावाला याने नंतर तिच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब आणि श्रद्धा एका डेटिंग साइटवर भेटले होते. त्यानंतर ते छतरपूरमध्ये भाड्याच्या घरात एकत्र राहत होते.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News: वसतिगृह हत्याकांड: विद्यार्थिनीने मृत्यूच्या तीन-चार दिवसांपूर्वी आईकडे सुरक्षारक्षकाची केली होती तक्रार
  2. Mumbai Crime News: मरिन ड्राइव्ह येथील मुलींच्या वसतिगृहात बलात्कार करून विद्यार्थिनीची हत्या? संशयित सुरक्षारक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या
  3. Pune Crime : मुलीच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या बापाची आई, मुलगी आणि प्रियकराने केली क्रूर हत्या

Last Updated : Jun 8, 2023, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.