मुंबई : विरोधी पक्षाच्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि ३१ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीत एकूण २६ ते २७ पक्ष सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जातीय. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधी आघाडीतील एक प्रमुख चेहरा असतील. या बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या आज (बुधवार, ३० ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुंबईत दाखल होतील.
अमिताभ बच्चन यांचे ममता बॅनर्जींना चहाचे निमंत्रण : ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी चहाचं निमंत्रण दिलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राखी पौर्णिमेच्या सणामुळे ममता बॅनर्जी अमिताभ यांच्या घरी जाणार आहेत. राजकीय वादविवादांपासून नेहमीच अलिप्त राहणारे अमिताभ बच्चन आणि ममता बॅनर्जी यांच्यातील या भेटीमागे अजिबात राजकारण नाही. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट असल्याचं कळतंय.
ममता बॅनर्जींचे बच्चन कुटुंबियांसोबत घनिष्ठ संबंध : ममता बॅनर्जी यांचे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यासोबत पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. यापूर्वी, २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन समारंभालाही हजेरी लावली होती. तिथं ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'भारतरत्न' देण्याची मागणी केली होती.
- जया बच्चन यांनी तृणमूलचा प्रचार केला होता : ममता बॅनर्जी यांचे अमिताभ यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत. जया बच्चन या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला होता.
हेही वाचा :
- INDIA meeting in Mumbai : 'इंडिया' च्या बैठकीत काय असणार अजेंडा? लालूप्रसाद यादव यांनी दिली स्पष्ट माहिती
- Sunny deol And Dimple kapadia : सनी देओल अमृता सिंगसोबत डिंपल कपाडियाच्या घराबाहेर दिसल्याने चर्चेला उधाण
- Aamir return to big screens : आमिर खान रुपेरी पडद्यावर परतणार, पुढच्या ख्रिसमसला होणार धमाका