ETV Bharat / state

Mumbai Crime News: होळीत अमली पदार्थ देण्याकरिता आलेल्या ड्रग्ज सप्लायर केली अटक; 67 लाखांचे ड्रग्ज जप्त - मालाड मालवणी पोलीस

मुंबई मालाड पक्षी मालवणी पोलिसांनी होळीचे रंग उधळणाऱ्या एका ड्रग्ज सप्लायरला अटक केली आहे. मुंबईत होळीच्या सणाच्या दिवशी ड्रग्ज पार्टीत एमडी ड्रग्ज आणि हेरॉईन ड्रग्ज वाटण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या मालवणी पोलिसांनी गस्तीदरम्यान ड्रग्ज सप्लायरला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 67 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

Mumbai Crime News
ड्रग्ज सप्लायरला अटक
author img

By

Published : Mar 8, 2023, 12:58 PM IST

मुंबई : मालाड मालवणी पोलीस 4 मार्च रोजी रात्री मालाड मालवणी चर्चजवळ मार्वे रोडवर गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एक संशयित व्यक्ती प्लास्टिकच्या बांगड्या घेऊन फिरताना दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिशवी आढळून आली. ज्यामध्ये सुमारे 130 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज आणि 12 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. पोलिसांनी सदर आरोपीची कोठडीत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. होळीमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने त्याने यूपीहून मुंबईत अमली पदार्थ आणले होते.

प्रतिक्रिया देताना निलेश साळुंखे एपीआय मालवणी तपास अधिकारी

ड्रग्ज पुरवण्याचे काम : मालवणी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एपीआय नीलेश साळुंखे यांनी सांगितले की, आरोपी लाल मोहम्मद हबीब शेख (48) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 52 लाख 15 हजार किमतीचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत अनेक दिवसांपासून ड्रग्ज पुरवण्याचे काम करणारा हा लबाड ड्रग्ज सप्लायर असल्याचे तपासात समोर आले आहे. 4 महिन्यांपूर्वी या आरोपीला काशी मीरा रोड पोलिस ठाण्यात ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटल्यानंतर कारागृहातून परतला होता. मालवणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थांसह अटक : मुंबईतील मालवणी पोलिसांनी मालाड परिसरातून एका ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थांसह रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 130 ग्रॅम ड्रग्ज, 3 ग्रॅम एमडी असा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालवणी पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश साळुंखे हे पथकासह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. मालवणी पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश साळुंखे हे पथकासह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. आरोपी मालवणी गावात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली.

हेही वाचा : Satara Crime News: धक्कादायक! आजोबाने जन्मलेल्या नातवाते शीर का केले धडावेगळे?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.