मुंबई - 2008 मध्ये राज्यातील मालेगावातील बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. खटल्याच्या संदर्भात साक्षीदारांची तपासणी पूर्ण झालेली आहे. आता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठीच्या स्थापन केलेल्या विशेष न्यायालयानं 25 सप्टेंबर रोजी यातील सर्वच आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व आरोपींना आता हजर राहणे सक्तीचे झालेले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आजपर्यंत अनेक आरोपींनी हजेरी लावली. मात्र काही आरोपींनी गैरहजेरीदेखील लावली. परंतु आता आरोपींना 25 सप्टेंबर 2023 रोजी सुनावणी करता गैरहजर राहून चालणार नाही. प्रत्यक्ष प्रत्येक आरोपीला हजर राहावेच लागणार आहे, असं या नोटीसमध्ये विशेष न्यायालयाने म्हटलेलं आहे. फौजदारी संहिता प्रक्रिया 313 नुसार मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील सर्वच आरोपींना हजेरी लावावी लागणार आहे.
आरोपींना मिळणार म्हणणं मांडण्याची संधी- आतापर्यंत आलेले पुरावे आणि आरोपींच्या संदर्भात गोळा केलेली माहिती त्या अनुषंगाने न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. या दिवशी होणाऱ्या सुनावणीमध्ये प्रत्येक आरोपींच्या संदर्भात त्यांच्यावरील जे काही आरोप ,पुरावे किंवा तथ्य त्यांना स्पष्टपणे सांगितले जाईल. त्यांना ते दाखवले जाईल. त्यानंतर त्यांना प्रत्येक आरोपींना त्यावर काही म्हणणं मांडायचं असेल काही प्रतिसाद द्यायचा असेल तर ती संधीदेखील दिली जाणार आहे.
एकूण 313 साक्षीदारांची साक्ष - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एकूण 313 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आलीय. आता यापुढे साक्षीदारांची साक्ष तपासणी आता बंद करीत आहोत, असं राष्ट्रीय तपास संस्थेच्यावतीने नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये स्पष्ट केले होते. विशेष न्यायालयाने आज त्या संदर्भात सर्वच आरोपींना याबाबत नोटीस बजावून प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी पार पडणार आहे.
अनेक साक्षीदार व्यक्ती फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात एनआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशामध्ये अत्यंत चर्चित असलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह अशा अनेक व्यक्तींवर आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणांमध्ये अनेक साक्षीदार व्यक्ती फितूर होत असल्यामुळेच न्यायालयामध्ये सज्जड पुरावे पटलावर उभे राहण्यात अडथळे आले आहेत.
हेही वाचा-