मुंबई Mumbai Pune Train cancelled : पुणे विभागातील लोणावळा-पुणे सेक्शनवरील खडकी-शिवाजीनगरदरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामामुळं गाड्यांचे वेळापत्रक रद्द करणं, वळवणं, बदलणं, मिलिटरी यार्डचं इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार आहे. दरम्यान, या कामामुळं मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वेगळ्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
एक्सप्रेस बंद राहण्याची वेळ : 25 नोव्हेंबर रोजी 8 वाजून 20 मिनिटांपासून हे इंटरलॉकिंग देखभालीचं काम सुरू होणार आहे. तर ते 26 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी 6:20 पर्यंत चालणार आहे. यामध्ये शेकडो कर्मचारी अभियंते काम करणार आहेत. हे काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळंच मुंबई ते पुणे दरम्यानच्या काही मेल एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्यात. तसंच 26 नोव्हेंबरला रात्री पर्यंत काही ट्रेन पूर्ववत होतील.
मुंबई ते पुणे या मार्गावरून धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस इंटरलॉकिंगच्या महत्त्वाच्या कामामुळं 25 नोव्हेंबर रोजी रद्द केल्या आहेत. तात्पुरती सेवा रद्द करण्यात आली आहे. काही गाड्या पुण्याच्या पुढं दक्षिण भारताकडे जातात तर या 26 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून पुन्हा सुरू केल्या जातील - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
या एक्सप्रेस मेल ट्रेन होणार रद्द : 25 नोव्हेंबर रोजी ट्रेन क्रमांक 12123 सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन आणि सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर 26 डिसेंबरला सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -